गडचिरोली : वैभव हॉटेल चोरी प्रकरणातील आरोपीच्या आवळल्या मुसक्या

1435

– अवघ्या चार दिवसात स्थानिक गुन्हे शाखेनीआरोपीस केले जेरबंद
The गडविश्व
गडचिरोली, ९ फेब्रुवारी : शहरातील नामांकित असलेल्या हॉटेल वैभव येथे २८ जानेवारी २०२३ रोजी चोरी झाल्याचे उघडकीस आले होते. आरोपी चोरट्याने दोन मोबाईल व दोन सोन्याच्या बांगड्या, मंगळसूत्र असा एकुण ३ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या चोरी प्रकरणातील आरोपीच्या अवघ्या चार दिवसात स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळत जेरबंद केले आहे. करण बुधाजी मरलावार रा. चांदली ता. सावली जि. चंद्रपुर असे आरोपीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, गडचिरोली शहरातील हॉटेल वैभव येथे असलेल्या कार्यक्रमानिमीत्त हरीनारायण मंगलप्रसाल पॉल हे त्यांचे परीवार व नातेवाईकांसह हॉटेल वैभव येथे वास्तव्यास असतांना २८ जानेवारी २०२३ रोजी रात्रोदरम्यान एका अनोळखी इसमाने दर्शनी भागात असलेल्या खिडकीतुन प्रवेश करुन हरीनारायण मंगलप्रसाल पॉल व त्यांचा परीवार गाढ झोपेत असल्याची संधी साधुन दोन मोबाईल व दोन सोन्याच्या बांगड्या, मंगळसूत्र असा एकुण ३ लाख ८१ हजार रुपयाचा मुद्देमाल चोरुन नेला. याप्रकरणी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस स्टेशन गडचिरोली येथील अधिकारी व कर्मचारी यांना तात्काळ निर्देशीत करुन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सुचना दिल्या असता त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली व पोलीस स्टेशन गडचिरोली यांनी त्यांची पथके तयार करुन गुन्हा उघडकीस आणण्याचा कसोशीने प्रयत्न केला.
दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा येथे मिळालेल्या गोपनिय माहितीचे आधारे पोलीस उपनिरीक्षक दिपक कुंभारे व त्यांचे पथकाने आरोपीस माडेतुकुम परीसरातुन ताब्यात घेवुन गुन्ह्यासंदर्भात सखोल विचारपुस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देवुन त्याने गुन्ह्यात चोरी गेलेला मुद्देमाल काढुन दिला.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा. , अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता सा. यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस स्टेशन गडचिरोली येथील अधिकारी व कर्मचारी यांनी केलेली.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Hotel Vaibhav Robary) (SP Nilotpal) (The GDV)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here