ग्रामीण रुग्णालय धानोरा येथे मोफत महाआरोग्य मेळावा व रक्तदान शिबिर संपन्न

198

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, १० फेब्रुवारी : हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या योजने अंतर्गत ९ फेब्रुवारी २०२३ ला ग्रामीण रुग्णालय धानोरा येथे मोफत महारोग्यमेळाव्याचे व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उदघाटन धानोरा नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ. पौर्णिमाताई सयाम यांनी केले तर अध्यक्ष म्हणून रुग्णकल्याण समितीचे सदस्य व सामाजिक कार्यकर्ते साईनाथ साळवे, प्रमुख अतिथी म्हणून सी आर पी एफ ११३ बटालियन चे डेप्टी कमांडंट एम के रिजन, सी आर पी एफ बटालियन चे डॉ. आदित्य पुरोहित, धानोरा येथील जेष्ठ नागरिक बंडूजी मशाखेत्री, ग्रामीण रुग्णालय धानोरा येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश गजभे यांच्या हस्ते झाले.
या शिबिरात धानोरा व आसपासच्या गावातील २०५ नागरिकांनी आरोग्यमेळाव्याचा लाभ घेतला. ग्रामीण रुग्णालय धानोरा येथील वैद्यकीय अधिकारी व चमू यांनी नागरिकांची आरोग्य तपासणी केली.
या कार्यक्रमा अंतर्गत रक्तदान शिबाराचे आयोजन करण्यात आलेले होते या शिबिरात एकूण १५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. सी आर पी एफ ११३ बटालियन च्या ११ जवानांनी व धानोरा येथील ४ रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजिक बांधिलकी जोपासली.
या शिबिराच्या यशस्वीतेकरिता डॉ. देवेंद्र सावसाकडे, डॉ. शीतल टेम्भूर्णे, डॉ. सिमा गेडाम, डॉ. मंजुषा लेपसे, डॉ. हेमराज मसराम, डॉ. सिमा आतमांडे, डॉ. नरडांगे, प्र शा त संदीप धात्रक, डेव्हिड गुरुनुले, गणेश मस्के, रवी वैरागडे, वर्षा गंगाखेडकर, अधिपरिचारिका अर्चना कळणाके, अर्शिया सैयद, सांतोष बरडे, ओंकार मांगळकर, आनंद देवीकर, संजय चापले, सरीन मादावी, मनीष ठाकरे, रुपेश उईके, गोपाल नेताम, मुकुल शेंडे व सर्व रुग्णालयीन अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य करून कार्यक्रम यशस्वी केला.
कार्यक्रमाचे संचालन गिरीश लेणगुरे यांनी केले व आभार गौतम राऊत यांनी मानले.

(The Gadvishva) (Gadchiroli news Updates) ( The GDV)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here