दुधमाळा आ.वि का सह. संस्थेतील धान खरेदीची मर्यादा वाढवण्याची शेतकऱ्यांची मागणी

299

– आमदार डॉ. होळी यांना निवेदनातून मागणी
The गडविश्व
ता/ प्र / धानोरा, १३ फेब्रुवारी : तालुक्यातील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था दुधमाळा येथिल १४० शेतकऱ्यांचे सातबारा आँनलाईन करुन सुद्धा धान खरेदी ची मर्यादा संपल्याने खरेदी केंद्रावर खरेदी करण्यास नकार दिल्याने मर्यादा वाढवून धान्य खरेदी करावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा आमदार डॉ. होळी यांना दिलेल्या निवेदनातून शेतकऱ्यांनी केली.
दुधमाळा आविकात परिसरातील १० गावांचा समावेश असून संस्थेला १३००० क्विंटल धान्य खरेदीची मर्यादा दिलेली होती. ती मर्यादा १५ जानेवारीला संपली व पुन्हा ५०० क्विंटल मर्यादा दिली आणि ती सुद्धा संपलेली आहे. १४० शेतकऱ्यांच्या धानाचे काटे झालेले नाहीत व हे सर्व शेतकरी दरवर्षी पीक कर्ज घेतात. जर धान्य खरेदी केले नाही तर या शेतकरी पीक कर्ज फेडायचे व आपला व मुलांबाळाचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तरी याविषयी दखल घेऊन त्वरित मर्यादा वाढवून दिल्यानंतरही १४० शेतकऱ्यांचे धान खरेदी करावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी आमदार डॉ. होळी यांना दिलेल्या निवेदनातून केले आहे. निवेदन देताना प्रभुजी मोरे, बापू उसेंडी, झिंगु मडावी,चंदू हलामी, राजकुमार महादेव नरोटे, शामराव करंगामी, भजनराव उईके आदी शेतकरी उपस्थित होते.

(The Gadvishva ) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (बिग बॉस 16 विनर) (Super Bowl) (Megan Fox) (Christ the Redeemer) (Man City vs Aston Villa) (Chelsea) (PSG) vs Toulouse) (Man United vs Leeds United) (MLA DR.Holi)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here