The गडविश्व
गडचिरोली,१८ फेब्रुवारी : पंचायत समिती, अहेरी, सन २०२२-२३ ची वार्षिक आमसभा धर्मरावबाबा आत्राम, आमदार, अहेरी ६९ निर्वाचन क्षेत्र तथा माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे अध्यक्षतेखाली २४ फेब्रुवारी 2023 रोज शुक्रवारला ११.०० वाजता अहेरी पंचायत समितीच्या प्रांगणात आयोजित केली होती. परंतु काही कारणास्तव आमसभाचे तारखेत बद्दल करुन आमसभा २१ फेब्रुवारी २०२३ ला आयोजीत केली आहे.तरी तालुक्यातील सर्व पदाधिकारी, सर्व प्रतिष्ठित नागरिक, सर्व समाजमाध्यम प्रतिनिधी, पंचायत समिती अंतर्गत सर्व ग्रामपंचायतींचे पदाधिकारी तथा नागरीक, तालुक्यातील सर्व विभागांचे अधिकारी यांनी उपस्थित राहुन वार्षिक आमसभेत सहभाग घेण्याचे आपणास आवाहन करण्यात येत आहे. असे सदस्य सचिव तथा गट विकास अधिकारी, पंचायत समिती, अहेरी यांनी कळविले आहे.

(The Gadvishva ) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (Shivratri images) (Karachi J-Hope) (Mahashivratri 2023) (Barcelona vs Man United) (Chelsea) (PSG) vs Toulouse) (Man United vs Leeds United)