रस्ता कामावरील वाहनांची केली जाळपोळ

1932

– दोन जेसीबी आणि एक मिक्सर मशीनचा समावेश
The गडविश्व
कांकेर, १९ फेब्रुवारी : जिल्ह्यात नक्षल्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढत मोठी घटना घडवून आणली. नक्षलग्रस्त परतापूर ते कोइलीबेडा मार्गावर सुरू असलेल्या रस्ता कामावरील वाहनाची नक्षल्यांनी जाळपोळ केल्याची घटना शुक्रवार सायंकाळ च्या सुमारास उघडकीस आली. जाळपोळ करण्यात आलेल्या वाहनांमध्ये दोन जेसीबी आणि एका मिक्सर मशीनचा समावेश असल्याचे कळते.
कांकेर जिल्ह्यातील परतापूर ते कोइलीबेडा मार्गावरील गट्टाकाल ते मेंड्री पर्यंत रस्ता बांधकाम सुरू होते. दरम्यान शुक्रवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास १० ते १५ नक्षली रस्ता बांधकामावर पोहचून बांधकामावर असलेल्या दोन जेसीबी आणि एक मिक्सर मशीन पेटवून दिली व घटनास्थळी उपस्थित वाहनचालक आणि मजुरांना काम न करण्याची धमकीही दिली अशी माहिती आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि सुरक्षा दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले.

(The Gadvishva) (Naxal) (Kanker) (Jalpol)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here