The गडविश्व
ता.प्र / धानोरा, २० फेब्रुवारी : तालुक्यातील निमगाव येथे रविवार १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती मोठ्या थाटात साजरी करण्यात आली.
निमगाव येथील हनुमान मंदिराच्या बाजुला लागुणच असलेल्या तेली समाज सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षपदी नरेंद्रजी भुरसे माजी उपसरपंच ग्रामपंचायत रांगी हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून दिवाकर भोयर सहाय्यक शिक्षक , भगवानजी खोब्रागडे, ठुमराज कुकडकर, नितीन कावळे, डॉ.रामटेके, पुरुषोत्तम राजगड, रामदास वासेकर माजी पोलीस पाटील, सौ.पुनम कावळे, कुकडकरबाई, आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिवछत्रपती यांच्या प्रतिमेला मार्ल्यापन करून दीपप्रज्वलीत करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर छोट्या छोट्या मुलींनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक यांच्या जीवनावर गीत सादर केले. सकाळी गावात फेरी काढून सायंकाळी सामूहिक भोजन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विठ्ठल चापडे यांनी केले, संचालन सहारे यांनी केले तर आभार तुळशीरामजी कुकडकर माजी उपसरपंच यांनी मानले. शिवजय जन्मोत्सव कार्यक्रमाला गावातील तरुण युवक, महिला, बालगोपाल, मंडळाचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (The Gdv) (Shivjayanti)