The गडविश्व
ता.प्र / धानोरा, २० फेब्रुवारी : तालुक्यातील मोहली येथिल जिल्हा परिषद हायस्कुल तथा कनिष्ठ महाविद्यालयात सन २०२३ या सत्रात वर्ग १० वी व वर्ग १२ वी ला शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला.
निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष नारायणजी पाटील पुंघाटे, प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापक डी. जी. नरोटे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष चंद्रमनी जी मेश्राम, शिक्षण तज्ञ दादाजी बावंथळे, सामाजिक कार्यकर्ते कुलपतीजी मेश्राम,सामाजिक कार्यकर्ते दिनकर जी तुलावी, प्रतिष्ठित नागरिक भारतजी कुमोटी, जेष्ठ शिक्षिका गद्देवार मॅडम, ब्रह्माटेके व सर्व शिक्षक वृद्द जिल्हा परिषद हायस्कूल मोहली प्रामुख्याने उपस्थित होते. मान्यवरांनी आगामी परीक्षेबाबतीत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व भविष्यात आपले व शाळेचे तसेच समाजाचे नाव उंच करावे याकरिता शुभेच्छा दिल्या. अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वट्टी यांनी, संचालन शाळेतील विद्यार्थी श्रद्धा नागपूरे व पलक वाकडे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार शिवानी पदा या विद्यार्थिनीने मानले. कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. राष्ट्रगीताने सांगता करण्यात आली.
(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (The Gdv) (Shivjayanti)