कारवाफा येथे ११३ बटालियनच्या वतीने धान्य बिजाचे वितरण

175

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, २० फेब्रुवारी : ११३ बटालियन केंद्रीय रिझर्व पोलीस बल चे कमांडेड दसवीर सिंह यांच्या मार्गदर्शनात अति संवेदनशील, नक्षल प्रभावी गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील कारवाफा येथे सिविक ॲक्शन प्रोग्राम २०२२- २३ अंतर्गत १६ फेब्रुवारी २०२३ ला कारवाफा येथील ६० शेतकऱ्यांना मोफत धान्य बिजाचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाला ११३ बटालियन सीआरपीएफ चे द्वितीय कमान अधिकारी अनिल शर्मा, निरीक्षक सनातन साहू, पोलीस मदत केंद्र कारवाफाचे पीएसआय सुनिता शिंदे, सरपंचा श्रीमती महानंदा आतला, श्रीमती ज्योती नरोटे ग्रामपंचायत खुटगाव आदी मान्यवर उपस्थित होते.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना ११३ बटालियनच्या वतीने ज्या नागरिकांना डिझाईन वाटप करण्यात आले त्या शेतकऱ्यांनी आभार मानले.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (The Gdv) (Shivjayanti)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here