‘जय भीम’ चित्रपट ऑस्करच्या यूट्यूब चॅनेलवर : ‘हा’ बहुमान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय चित्रपट

261

The गडविश्व
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून दाक्षिणात्य चित्रपट सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. विशेष म्हणजे सुपरस्टार अल्लू अर्जूनचा पुष्पा- द राइज चांगलाच चर्चेत आला आहे. दरम्यान, ‘जय भीम’ या दाक्षिनात्य चित्रपटाने एका गोष्टीमुळे भारतीयांची मान उंचावली आहे. ‘जय भीम’ दाक्षिनात्य सिनेमा आता ऑस्करच्या यूट्यूब (Oscar youtube) चॅनेलवर दिसणार आहे. हा मान मिळणारा ‘जय भीम हा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे.
‘जय भीम’ चित्रपट अमेझॉनवर प्रदर्शित झाल्यापासूनच चर्चेत आहे. भारतातील जातीय विषमता आणि त्यामुळे आदिवासी समुहांना भोगाव्या लागणाऱ्या वेदना आणि जगावे लागणरे गुन्हेगारांचे जीवन यात दाखवण्यात आले आहे. या चित्रपटाचे देशभर कौतुक झाले असून आता ऑस्कर अकॅडमीने चित्रपटाचा विशेष सन्मान केला आहे.

ऑस्करने आपल्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर ‘जय भीम’ चित्रपटाला स्थान दिले आहे. असा सन्मान मिळवणारा जय भीम पहिला तामिळ चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाची निर्मिती अभिनेता सूर्याची आहे. यात सूर्याने आदिवासींच्या हक्कासाठी लढणाऱ्या वकील चंद्रू यांची भूमिका साकारली आहे.
काही दिवसांपूर्वी IMDB ने 2021 मधल्या लोकप्रिय चित्रपटांची यादी जाहीर केली. यात ‘जय भीम’ चित्रपटाने पहिले स्थान पटकावले. इतरही अनेक पुरस्कार या चित्रपटाला प्राप्त झाले. याचसोबत हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला. आणि ‘जय भीम’ हा दाक्षिनात्य सिनेमा आता ऑस्करच्या यूट्यूब चॅनेलवर दिसणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here