The गडविश्व
ता.प्र / धानोरा, ५ मार्च : प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्या.धानोरा र.न.७१० येथील सन २०२३-२०२८ या वर्षा करिता संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणुक आज विवार ५ मार्च २०२३ रोजी होत आहे.
या निवडणुकीत सध्या दोन पॅनल मध्ये सरळ लढत आहे. आहे तरी यात कोणता मतदार निवडून देणार याकडे सर्वाचेच लक्ष लागले आहे. या निवडणुकीत दोन पँनलमधे सरळ लढत असले तरी यात चांगली चुरस निर्माण झालेली आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे सहकार क्षेत्रातील २०२२ मधे होणाऱ्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या आता शासनाच्या परिपत्रक व शासन निर्णय यामुळे सहकार क्षेत्रातील निवडणुका घोषित करण्यात आले असून धानोरा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित धानोरा संचालक मंडळाची निवडणूक रविवार ५ मार्च २०२३ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत पार पडणार आहे .या निवडणुकीत सत्ताधारी पॅनलच्या विरोधात शिक्षक मित्र पँनल उभी केली आहे. यात कोण बाजी मारणार ते लवकर कळेल. याकडे सर्व शिक्षकांचे लक्ष लागले आहे.

(The Gadvishva) ( gadchiroli news updates) (election techer) (Election of Dhanora Teachers Credit Union tomorrow)