-८० रुग्णांनी घेतला गाव पातळी शिबिराचा लाभ
The गडविश्व
गडचिरोली, ५ मार्च : जिल्ह्यातील विविध गावातील गाव संघटनेच्या मागणीनुसार मुक्तीपथ अभियानाच्या वतीने गाव पातळी व्यसन उपचार शिबिरांचे आयोजन केल्या जाते. नुकतेच भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम हिंदेवाडा, इर्पणार, धानोरा तालुक्यातील गोडलवाही, देसाईगंज मधील कोरेगाव तसेच कुरखेडा तालुक्यातील कन्हारटोला येथील शिबिराच्या माध्यमातून ८० रुग्णांनी उपचार घेतला. व्यसन उपचार घेण्यासाठी विविध गावातील लोक पुढाकार घेत असल्याचे दिसून येत आहे.
भामरागड तालुक्यातील हिंदेवाडा येथील गाव पातळी व्यसन उपचार शिबीरामध्ये २१ रुग्णांनी पूर्ण उपचार घेतला. यशस्वीतेसाठी मुक्तीपथ गाव संघटनेचे बाजीराव वेलादी, मनोहर सडमेक, मोहन, बंडू पुंगाटी लालू आत्राम यांनी सहकार्य केले. अतिदुर्गम इर्पणार येथील शिबिरातून १४ जणांनी उपचार घेतला. गाव पातळी क्लिनिक यशस्वी करण्याकरिता गाव पाटील तिरसा गावडे, सुधाकर मडावी, वडडे यांनी सहकार्य केले. दोन्ही क्लिनिकचे व्यवस्थापन व नियोजन तालुका कार्यकर्ता आबिद शेख व विद्या पुंगाटी यांनी केले. रुग्णांची केस हिस्ट्री संयोजिका पूजा येल्लुरकर यांनी घेतली. समुपदेशन साईनाथ मोहुर्ले यांनी केले.
धानोरा तालुक्यातील गोडलवाही येथे सघन बैठकीच्या माध्यमातून गावपातळी शिबिर आयोजित केला होता. यात एकूण १६ रुग्णांनी नोंदणी करून परिपूर्ण उपचार घेतला. देसाईगंजमधील कोरेगाव या गावामध्ये आयोजित शिबिरामध्ये १४ जणांनी उपचार घेतला. अनुप नंदगिरीवार यांनी शिबिराचे आयोजन व नियोजन केले. यासाठी ग्रामपंचायतचे सरपंच आणि पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. कुरखेडा तालुक्यातील कन्हारटोला येथील शिबिरात १५ रुग्णांनी पूर्णवेळ उपचार घेतला. रुग्णांची नोंदणी कान्होपात्रा राऊत यांनी केली. शिबिराचे नियोजन मुक्तिपथचे विनोद पांडे यांनी केले. शिबिर यशस्वी होण्यासाठी उमाजी कर्मकर, सुखलाल दुधकवर, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व गाव संघटनचे सदस्य यांनी अथक परिश्रम केले. यावेळी प्राजू गायकवाड यांनी समुपदेशन केले तर प्रभाकर केळझरकर यांनी रुग्णांची हिस्ट्री घेतली.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (Chandrpur News Updates) (Chandrapur Collector) (The Gdv) (IND vs AUS) (Juventus vs Torino) (Jungkook) (Man United vs West Ham) (Justin Bieberl)