The गडविश्व
प्रतिनिधी / ढाणकी-यवतमाळ (प्रवीण जोशी), ८ मार्च : आज जागतिक महिला दिन साजरा होत असताना महिलांनी चोखपणे पार पाडलेल्या सर्व समावेशक भूमिकेबद्दलचे कृतज्ञता व्यक्त करणे होय. क्षेत्र कोणतेही असो जी जबाबदारी तिच्यावर दिल्या गेली ती अगदी कोणत्याही प्रकारची कपट व लोभी भावना न ठेवता विविध नटलेल्या दैनंदिन आयुष्यातील भूमिका बजाविल्या व त्याला चोख आणि योग्य न्याय दिला. अनेक क्षेत्रात यशस्वी होऊन अनेक दैदिप्यमान कठीनातील कठीण प्रसंग पार केले व प्रत्येक यशस्वी पुरुषामागे ठामपणे स्त्रीने आपली भूमिका बजावल्याशिवाय तो कधीच यशस्वी झालेला नाही हे आजतागायत प्रत्येकच जण मान्य करतात व त्याप्रती आजचा आदरयुक्त भावना व्यक्त करण्याचा बहुता जागतिक स्त्री दिन असावा.
काम कोणतेही लहान मोठे कधीच नसते मग स्त्री ही वैमानिक चालवणारी असो की मग शहरातील कचरा संकलन करणारी काम कोणतीही श्रेष्ठच असते असे गाडगेबाबा यांनी सुद्धा सांगितले. आपले कर्म चोख पार पाडणे यातूनच सत्कर्माची ओळख निर्माण व उत्कृष्ट कर्मावरून भविष्यात माणसाची ओळख निर्माण होते. आजचा प्रसंग सुद्धा तसाच होता रोज सकाळी अनेक प्रभागातील कचरा संकलन करून शहराला स्वच्छ ठेवण्याच्या भूमिकेमध्ये एक स्त्री सुद्धा तितक्यात उत्कृष्ट पद्धतीने भूमिका बजावताना दिसत आहे. कुंभमेळ्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सफाई कामगाराची पाद्यपूजन करून धन्यवाद मानले व त्यांना सन्मान दिला व त्यांच्या सत्कर्म युक्त भूमिकेची दखल खुद पंतप्रधानांनी घेतली. आजच्या जागतिक स्त्री दिनानिमित्त कचरा संकलन करून ढाणकी शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या महिला भगिनीस साडी चोळी देऊन यावेळी अनिता जिल्हावार यांनी कृतज्ञता व्यक्त केली. हा क्षण खूप भावनिक होता. कचरा संकलन करणाऱ्या महिलेला सन्मान होत असताना कुठेतरी आपण बजावित असलेली काम सुद्धा श्रेष्ठच आहे व याची दखल घेतल्या गेली याची जाण होत असताना महिलेच्या चेहऱ्यावर समाधान दिसले.

(The gadvishva) (The gdv) (Womens Day 2023)