The गडविश्व
गडचिरोली, १३ मार्च : मुक्तीपथ तालुका संघटनेच्या महिलांनी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून देसाईगंज शहरातून रॅली काढली. सोबतच अवैध दारूविक्री बंद करण्याच्या मागणीसह विविध मागण्यांचे निवेदन पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय आणि उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयाला सादर करण्यात आले.
मुक्तीपथ तालुका संघटनेच्या महिलांनी देसाईगंज शहरातील हुतात्मा स्मारक ते पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय आणि उपविभागीय महसूल अधिकारी यांच्या कार्यालयापर्यंत रॅली काढली . सोबतच विविध मागण्यांचे निवेदन शासन दरबारी सादर करून घोषणा देण्यात आल्या. यात तालुक्यातील अवैद्य व्यवसास आणि अवैध दारू विक्री बंद करा, गरीब लोकांसाठी घरकुल उपलब्ध करून घरकुलासाठी रेती उपलब्ध करून द्या, सिलेंडरचे भाव कमी करा, अपंग दारू विक्रेत्यांच्या योजना रद्द करण्यात याव्यात, तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील किराणा, पानठेल्यावर कायद्याने बंदी असलेली सुगंधित तंबाखू विक्री होते. ती बंद होणे करिता सुगंधित तंबाखू विक्री बंद कायद्या अंतर्गत नोंदणी करावी आदी मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. सोबतच शहरासह तालुक्यातील विविध गावातील विक्रेत्यांची यादी पोलिस विभागाला सादर करण्यात आली.
यावेळी संघटनेच्या अध्यक्षा अवसरे, उपाध्यक्ष निलोफर, मुक्तीपथ टीम भारती उपाध्याय,अनुप नंदगीरवार, शालिनी मेश्राम, नयना घुगुस्कर यांच्यासह वडसा तालुक्यातील वीर्शी वॉर्ड, हेटीवार्ड, आंबेडकर वॉर्ड, जुनी वडसा वॉर्ड , नैनपुर वॉर्ड, तुकुम वॉर्ड, गांधी वॉर्ड ,राजेंद्र वॉर्ड , हटवार मंगल कार्यालय एरिया , ,फवारा चौक, हनुमान वॉर्ड, किदवाई वॉर्ड , कमला नगर , सिंधी मोहल्ला, चिखली तुकुम, चिखली रीठ, कुरूड , कोंढाळा, चोप, आमगाव, विसोरा , कीन्हाला, डोंगरगाव, चोप, शिवराजपुर , कोकडी, डोंगरगाव, विहिरगाव, बोडधा आदी गावांतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.