-गाव पातळी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
The गडविश्व
गडचिरोली, १५ मार्च : मुक्तिपथद्वारे सुरु करण्यात आलेले गाव पातळी व्यसन उपचार शिबीर दुर्गम भागातील रुग्णांसाठी लाभदायी ठरत आहे. नुकतेच सुरजागड, कोलपली व पदाबोरिया येथील शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देत एकूण ४८ रुग्णांनी उपचार घेतला व दारूचे व्यसन सोडण्याचा निर्धार केला.
एटापल्ली तालुक्यातील सुरजागड येथे घेण्यात आलेल्या शिबिरात एकूण १९ पेशंटनी पूर्णपणे उपचार घेतला. रुग्णांची नाव नोंदणी रुणाली कुमोटी यांनी केली. शिबिराचे नियोजन रवी वैरागडे यांनी केले. हे शिबिर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी गावातील प्रतिष्ठित नागरिक लालसाय तलांडे ( भुमिया) यांनी सहकार्य केले. अहेरी तालुक्यातील कोलपल्ली येथील शिबिरात १५ लोकांनी नोंदणी केली व १३ लोकांनी पूर्ण उपचार घेतला. शिबिरात रुग्णांची केस हिष्ट्री पूजा येल्लुरकर यांनी घेतली तसेच साईनाथ मोहुर्ले यांनी रुग्णांना धोक्याचे घटक, दारूचे दुष्परिणाम, नियमित उपचार घेणे आदींसंदर्भात माहिती देत रुग्णांना समुपदेशन केले. शिबिराचे नियोजन तालुका प्रेरक आनंदराव कुम्मरी यांनी केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी पोलिस पाटील बिच्चा अत्राम, युवक शाम अत्राम व इतर गावकऱ्यांनी सहकार्य केले.
धानोरा तालुक्यातील दुर्गम अशा पदाबोरिया येथे गाव पातळी एकदिवसीय शिबिर आयोजित करण्यात आले. शिबिरात एकुण १६ पेशंटनी पूर्णपणे उपचार घेतला. शिबिरात समुपदेशन छ्त्रपती घवघवे यांनी केले. केस हिस्ट्री स्पार्क कार्यकर्ता शुभम बारसे यांनी घेतली. रुग्णांची नोंदणी भास्कर कड्यामी यांनी घेतली. शिबिर यशस्वीतेसाठी भूमिया दिनेश पदा, ग्रामसभा अध्यक्ष मोतीराम पदा, निरंगसाय पदा, सुकांती पदा, मंगीबाई पदा यांनी सहकार्य केले. अशा एकूण ४८ रुग्णांनी गाव पातळी शिबिरातून उपचार घेत दारूचे व्यसन सोडण्याचा निर्धार केला आहे.
