– विद्यार्थ्यांना केले महाराष्ट्र लोकसेवाआयोग या परीक्षे संदर्भात मार्गदर्शन
The गडविश्व
प्रतिनिधी / ढाणकी, १५ मार्च : निवडणुका जयंती व वर्षातून इतर सण उत्सवानिमित्त पोलीस यांचा बंदोबस्त असतोच त्या शिवाय या सर्व बाबी शांततेने सुरळीच पार पडत नाही. कुठे तेढ आणि तणाव निर्माण झाल्यास लगेच पोलिसांना पाचारण करण्यात येते आणि हजारोंच्या जमावाला काही अत्यंत कमी स्वरूपात असलेले पोलीस जमलेल्या प्रचंड जमावाला शांत करतात शिवाय या व्यस्त कार्यक्रमातून त्यांना छंद आणि विरंगुळा जपायला वेळ फार कमी असतो कारण अंगावर असलेली वर्दी त्यांना नेहमीच कर्तव्याची जाण करून देते यामध्ये कधी कधी मित्र आणि आप्तेष्ठानच्या शुभप्रसंगी व अडी अडचणींना बाजूला सारून कर्तव्य पार पाडताना आपल्याला दिसतात. आपण अनेक वेळा बघितल आहे की पोलिसात सुद्धा उत्कृष्ट आणि हरहुन्नरी कला कौशल्य बघायला मिळाले कोणी गायक कोणी उत्कृष्ट हॉलीबॉलपटु तर कोणी क्रिकेटपटू असाच काहीसा प्रसंग बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी त्यांच्यात दडलेला एक उत्कृष्ट अष्टपैलू क्रिकेटपटू बघायला मिळाला. बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ढाणकी शहरात पोलीस चौकी असून पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रताप भोस हे नियमित कर्तव्य बजावत असताना पोलीस चौकी समोर खुले मैदान असून येथे काही तरुण हे क्रिकेट खेळत होते.
आणि दैनंदिन ठरलेल्या वेळाप्रमाणे रोजची कामगिरी पार पाडून पोलिसांची गाडी चौकीकडे येत असल्याचे बघून क्रिकेट खेळत असलेले तरुण खेळ थांबून पोलीस आपल्याला पिटाळून लावतील या भावनेतून तरुणांनी आपला खेळ थांबवला पण तितक्यातच ठाणेदार प्रताप भोस यांनी मुलांना थांबवून आपला मोर्चा क्रिकेट या खेळाकडे वळविला. प्रथम गोलंदाजी करत असताना त्यांनी मुलांना विविध प्रकारचे चेंडू टाकले यातही लेग ब्रेक, यारकर, इन्स्विंग आऊट स्विंग असे एकापेक्षा एक अप्रतिम चेंडू टाकून महाविद्यालयीन तरुणांच मन जिंकले तर फलंदाजी मध्ये स्वीप, स्क्वेअर कट, पूल शॉट, असे उत्कृष्ट व तडाकेबंध शॉट खेळून तरुणांमध्ये एक चैतन्य निर्माण केले आणि बघता बघता साहेब व त्यांचा ताफा आलेला बघून निघून जाणारी महाविद्यालयातील तरुण मुलं क्रिकेट खेळामध्ये अगदी रममाण आणि तल्लीन झालेली बघायला यावेळी मिळाली. एक उत्कृष्ट खेळाडू पोलिसांमध्ये बघायला मिळाला व क्षेत्ररक्षण सुद्धा तेवढ्याच चपळ गतीने करून अष्टपैलू खेळाडू असल्याची चुणूक यावेळी ठाणेदार यांनी आपल्या खेळातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दाखवली.
पोलीस चौकीच्या समोर खेळत असताना पोलीस पिटाळून लावतील या हेतूने आपला खेळ अर्धवट सोडून जाणारी तरुण महाविद्यालयीन मुलं बघता बघता ठाणेदार यांच्यासोबत चांगलीच रममान झालेली बघायला मिळाली व त्यांची गट्टी जमली व याच माध्यमातून ठाणेदारासोबत महाराष्ट्र लोकसेवा आयोग इतर पदांच्या भरतीसाठी महाविद्यालयीन तरुण चर्चा करताना दिसत होते.
