कारसपल्ली येथील विक्रेत्यावर गुन्हा दाखल

106

The गडविश्व
गडचिरोली, १५ मार्च : सिरोंचा तालुक्यातील कारसपल्ली येथे सिरोंचा पोलिस, गाव संघटना व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्त कारवाई करीत चार ड्रम गुळाचा सडवा नष्ट केला. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिरोंचा पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कारसपल्ली या गावातील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी गाव संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. तरीसुद्धा गावातील काही मुजोर विक्रेते चोरट्या मार्गाने दारूविक्री करतात. सध्यस्थितीत गावात चार दारूविक्रेते सक्रिय आहेत. अशातच गावातील एका विक्रेत्याने दारू गाळण्यासाठी गुळाचा सडवा टाकला असल्याची माहिती मिळाली. प्राप्त माहितीच्या आधारे सिरोंचा पोलिस, मुक्तिपथ तालुका चमू व गाव संघटनेने संयुक्तरित्या मोहीम राबवत, दारूविक्रेत्यांच्या घर परिसराची पाहणी केली. दरम्यान, एका घरी ३९ हजार रुपये किंमतीचा चार ड्रम गुळाचा सडवा आढळून आला. पोलिसांनी संपूर्ण मुद्देमाल नष्ट करीत एकावर गुन्हा दाखल केला आहे. यावेळी बिट अंमलदार राजू चव्हाण व टीम, मुक्तिपथ तालुका चमू, गाव संघटनेच्या महिला उपस्थित होत्या.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (Chandrpur News Updates) (GPT-4) (Bihar Board 12th Result 2023) (Poco X5 5G) (Sameer Khakhar) ( Imran Khan) (Lawrence Bishnoi) (Adani Enterprises) ( Northern Lights) (Inter Milan)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here