ST प्रवासात आजपासून महिलांना ५० टक्के सवलत

1038

– शासनाचे आदेश जारी
The गडविश्व
मुंबई, १७ मार्च : महाराष्ट्र राज्याच्या सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पामध्ये सर्व महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस प्रवास भाडयामध्ये 50 टक्के सवलत घोषित करण्यात आली होती. सदर घोषणेच्या अनुषंगाने आज १७ मार्च २०२३ पासून सर्व महिलांना राज्याच्या हद्दीमध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस प्रवास भाडयामध्ये ५० टक्के सवलत करण्यात आली आहे. याबाबतचे शासनाचे आदेश जारी करण्यात आले आहे. एसटी महामंडळाच्या या योजनेला ‘महिला सन्मान योजना’ म्हणून ओळखले जाणार आहे.
राज्याच्या अर्थसंकल्पात (Maharashta Budget) उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक घोषणा केल्या आहेत. यामध्ये एसटीमधून प्रवास (ST News) करणाऱ्या महिलांना प्रवास तिकिट दरात ५० टक्के सवलत देणार असल्याचे जाहीर केले होते. परंतु, या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी जीआर निघाला नव्हता. एसटी प्रवासातील सवलतीबाबत शासनाने घोषणा ९ मार्चला केली तरी त्याची अंमलबजावणी करण्यासाठी शासन आदेशाची (GR) आवश्यकता असते. शासन आदेशाशिवाय कोणत्याही घोषणेवर अंमलबजावणी होत नाही.

सर्व महिलांना सर्व प्रकारच्या बसेसमध्ये ५०% सवलत अनुज्ञेय करणे बाबत निर्देश प्राप्त झाले असून त्यानुसार पुढील प्रमाणे सुचना देण्यात आले आहेत.

सर्व महिलांना रा.प. महामंडळाच्या सर्व प्रकारच्या [ साधी, मिडी /मिनी, निमआराम, विनावातानुकुलीत, शयन आसनी, शिवशाही (आसनी), शिवनेरी, शिवाई ( साधी व वातानुकुलीत ) इतर इत्यादी ] बसेसमध्ये ५०% सवलत १७ मार्च २०२३ पासुन अनुज्ञेय करण्यात येत आहे. सदरची सवलत ही भविष्यात रा.प. महामंडळाच्या ताफ्यात नव्याने दाखल होणाऱ्या सर्व प्रकारच्या बसेस करिता देखील लागु राहील. सदर योजना ही ‘महिला सन्मान योजना ‘या नावाने संबोधण्यात येत आहे, सदर सवलत सर्व महिलांना महाराष्ट्र राज्याच्या हद्दी पर्यंत अनुज्ञेय आहे, सदर सवलत शरि वाहतुकीसाठी अनुज्ञेय नाही, ज्या महिलांनी रा.प. महामंडळाच्या बसेसचे प्रवासाचे आगाऊ आरक्षण तिकीट (Advance Booking) घेतलेले आहे. अश्या महिलांना ५०% सवलतीचा परतावा देण्यात येऊ नये. सवलत अनुज्ञेय केलेल्या दिनांक पुर्वीच्या आगाऊ आरक्षणावर केलेल्या प्रवासाचा परतावा देण्यात येऊ नये, सर्व महिलांना प्रवास भाड्यात ५०% सवलत असली तरी या योजनेतील जे प्रवाशी संगणकीय आरक्षण सुविधेव्दारे, विंडो बुकींगव्दारे, ऑनलाईन, मोबाईल ॲपव्दारे, संगणकीय आरक्षणाव्दारे तिकीट घेतील अशा प्रवाशांकडुन सेवा प्रकार निहाय लागु असलेला आरक्षण आकार वसुल करण्यात यावा, सर्व महिलांना प्रवास भाड्यात शासनाने ५०% सवलत दिली असल्याने ५०% प्रवास भाडे आकारले जाणार आहे. त्यामुळे प्रवास भाड्यातील अ.स. निधी व वातानुकुलित सेवांकरीता वस्तु व सेवाकरची रक्कम आकारण्यात यावी, मॅन्युअल पद्धतीने तिकीट देण्याची कार्यवाही —महिलांना दिलेल्या ५०% सवलतीच्या मुल्याची परिगणित करणेसाठी स्वतंत्र तिकीट छपाई करावी लागेल. सदरची सवलत ही ५०% असल्यामुळे त्या तिकीटांचे वसूली मूल्य ५० % राहिल. प्रवास केलेल्या महिलांची एकूण संख्या समजावी याकरिता प्रत्येक महिलेस हे मुळ तिकीट वाहकाने दिलेच पाहिजे. (तिकीट रंगसंगती स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.)
सर्व महिलांना प्रवास भाडयात ५० % सवलत दयावयाची असली तरी त्याची प्रतिपूर्ती शासनाकडे मागणीसाठी त्यांना ईटीआय ओआरएस कार्यप्रणाली बंद पडल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून छापील तिकीटे देणे आवश्यक आहे. त्यासाठी रु.५/-, रु.१०/- मुल्यवर्गाची मूळ तिकीटे व रु. १०/-, रु. २०/-रु.३०/-, रु.४०/- रु.५०/- व रु.१००/- मुल्यवर्गाची जोड तिकीटे देण्यात यावीत. सदरची सवलत इटीआय मशीन मध्ये ७७ क्रमांकावर प्राप्त होईल. लेखाशीर्ष महिलांना देण्यात येणाऱ्या विनामुल्य प्रवास सवलतीच्या रकमेची परिगनणा करणेसाठी स्वतंत्र लेखाशीर्ष देण्यात येत आहे. ( याबाबत नंतर कळविण्यात येईल.) ७५ वर्षावरील महिलांसाठी ‘अमृत जेष्ठ नागरिक’ योजनेच्या परिपत्रकीय सुचनेनुसार १००% सवलत अनुज्ञेय राहिल. ६५ ते ७५ या वयोगटातील महिलांना ‘महिला सन्मान योजना’ हीच सवलत अनुज्ञेय राहिल. ५ ते १२ या वयोगटातील मुलींना यापुर्वी प्रमाणेच ५०% सवलत अनुज्ञेय राहिल.
सदर सवलतीपोटी येणारी रक्कम मोठया प्रमाणात असल्यामुळे त्याचा कोणत्याही स्तरावर गैरवापर होऊ नये म्हणुन आणि महामंडळास शासनाकडुन मिळणारी प्रतिपुर्ती अचुक मिळावी या करीता आगार लेखाकार यांनी त्याचे लेखापरीक्षण करावयाचे आहे. महिला सवलतीच्या संदर्भात हिशोब तपासणी, लेखा परीक्षणाची पद्धती याबाबतच्या सुचना स्वतंत्र परिपत्रकाव्दारे लेखा शाखेव्दारे निर्गमित करण्यात येणार आहे.
विभाग नियंत्रकांनी विभागीय वाहतूक अधिकारी, विभागीय लेखाधिकारी, आगार व्यवस्थापक, आगार लेखाकार, स्थानकप्रमुख यांच्या बैठका आयोजीत करुन सदर सवलतीबाबत सविस्तर सुचना द्याव्यात. आगार व्यवस्थापकांनी प्रस्तुत सवलतीची माहिती सर्व पर्यवेक्षकीय कर्मचारी व चालक वाहक यांना व्हावी या हेतुने कर्मचारी सुचना फलक, रोकड तिकिट विभाग, स्थानक प्रमुख कार्यालय, प्रवासी सुचना फलक इ. ठिकाणी सदर सवलती बाबतची माहिती वाचनीय व दर्शनीय स्वरुपात प्रसिद्ध करण्यात यावी व वर्तमान पत्रातून सदर सवलतीस प्रसिद्धी देण्यात यावी असे सूचित केले आहे.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (Chandrpur News Updates) (GPT-4) (Bihar Board 12th Result 2023) (Poco X5 5G) (Sameer Khakhar) ( Imran Khan) (Lawrence Bishnoi) (Adani Enterprises) (Northern Lights) (Inter Milan)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here