दारूच्या व्यसनातून त्रस्त रुग्णांची क्लिनिकला भेट

119

-८१ जणांनी घेतला उपचार
The गडविश्व
गडचिरोली, १९ मार्च : दारूच्या व्यसनामुळे त्रस्त झालेल्या रुग्णांनी आपल्या तालुक्यातील व्यसन उपचार क्लिनिकला भेट देऊन आपली समस्या सांगितली. या माध्यमातून विविध तालुक्यातील ८१ रुग्णांवर उपचार करण्यात आला.
दारुचे व्यसन सोडण्याची इच्छा असणाऱ्या रुग्णांना उपचाराची सोय उपलब्ध व्हावी यासाठी बाराही तालुका मुख्यालयी व्यसन उपचार तालुका क्लिनिक सुरू करण्यात आली. या माध्यमातून आतापर्यंत अनेक रुग्णांनी उपचार घेऊन दारुचे व्यसन सोडले आहे. आरमोरी येथील क्लिनिकमध्ये २३, देसाईगंज १९, धानोरा १०, एटापल्ली १४, चामोर्शी ९, अहेरी ६ अशा एकूण ८१ जणांनी व्यसन उपचार घेतला आहे.
क्लिनिकला भेट दिलेल्या रुग्णांना तज्ञ समुपदेशक मार्गदर्शन करतात. रुग्णांना व्यसनाचे प्रकार, दुष्परिणाम, नियमितपणे औषधोपचार, धोक्याचे घटक, शरीरावर होणारे परिणाम आदींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सोबतच संयोजक रुग्णांची केस हिष्ट्री घेऊन नियमित औषधोपचार घेण्याचे आवाहन करतात.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (Chandrpur News Updates) (Nottm Forest vs Newcastle) (Lance Reddick) (F1) (OPPO N2 Flip) (IND vs AUS) (Australia vs India)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here