अवकाळी गारपिटीने झालेल्या नुकसानीची आकोली येथे आ.नामदेव ससाने यांनी केली पाहणी

242

The गडविश्व
प्रतिनिधी / ढाणकी, २० मार्च : ढाणकी आणि अकोली परिसरात १८ मार्च रोजी अवकाळी पावसाने व गारपिटीने शेतकऱ्याच्या हाती आलेल्या मालाचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अस्मानी आणि नैसर्गिक आपत्तीने शेतकरी पूर्णतःहा पिचून गेलेला असून एवढे सगळे असताना तुर, गहू ,कापूस, या शेतकऱ्याच्या मुख्य पिकाला सुद्धा मनावा तेवढा भाव नाही. यावेळी शेतकरी बियाणे विकत घेऊन पेरतो त्यावेळेस वारे माप व महागा मोलाचे बियाणे घेऊन पेरणी करावी लागते पण जेव्हा तोच पेरलेला माल बाजारात आणल्यानंतर त्याला अल्पभाव मिळते अशा अनेक अडचणींना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे.
निसर्गाने जे काही नुकसान झाले त्याची मोजमाप कधीच लावणे शक्य नसते तरी पण शेतकऱ्यांना शक्य तितकी मदत देणे राज्य सरकारचे कर्तव्य असून यावेळी ओला दुष्काळ आणि रब्बीला सुद्धा निसर्गाचा फटका बसला त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आलेला आहे. तसेच शक्य तितकी मदत केल्या जाईल व तशा प्रकारचा पाठपुरावा सरकारकडे केल्या जाईल असे उमरखेड महागाव विधानसभेचे आ.नामदेव ससाने हे अकोली येथील अवकाळी पाऊस व गारपीट पाहणी दौरा १९ मार्च ला करीत असताना बोलत होते.
यावेळी तहसीलदार, आनंद देऊळगावकर, तालुका कृषी अधिकारी बळवंतकर, दत्त दिगंबर वानखेडे, प्रवीण पाटील मिराशे देविदास जामकर, संदीप धात्रक, सुभाष चिन्नावार, मंडळ अधिकारी सचिन फटाले, तलाठी, कृषी सहाय्यक, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व असंख्य शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

(The gadvishva) (The gdv)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here