– नगरपंचायतने काढावा कायम तोडगा
The गडविश्व
प्रतिनिधी / ढाणकी, २१ मार्च : बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा फटका तर बसलाच आहे शिवाय गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या पाण्यामुळे व्यापाऱ्याच्या दुकानासमोरील भागात नगरपंचायत प्रशासनाने लिकिज काढण्यासाठी खोदकाम करून ठेवल्यामुळे व्यापाऱ्यांची मोठ मोठी वाहनांमध्ये आपला माल बोलावला असताना व तो दुकानात खाली करावयास गेले असता वाहने फसत असून व्यापाऱ्यांना मात्र या बाबीचा नाहक विनाकारण त्रास होताना बघायला मिळत आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जवळ नगरपंचायत मार्फत पाण्याची गळती रोखण्यासाठी खोदकाम करण्यात आले पण वारंवार केलेल्या खोदकामामुळे तेथील जागा भुसभुशीत झाली व अनेक जड वाहने फसत असून व्यापाऱ्यांची संकुल या ठिकाणी असल्यामुळे नेहमी जड वाहने येऊन व्यापारी आपला माल आपल्या संकुलनात ठरलेल्या ठिकाणी उतरवत असतात पण या केलेल्या खोदकामामुळे व्यापाऱ्यांना व सर्वसामान्य पादचाऱ्यांना याचा नाहक त्रास होत आहे यावर नगरपंचायत प्रशासनाने योग्य उपाययोजना करून व्यापारी बांधवांची आणि सर्वसामान्य पादचाऱ्यांची अडचण दूर करावी असे सर्वसामान्यांकडून बोलले जात आहे
माझ्या दुकानासमोरील गेल्या एक महिन्यापासून नगरपंचायत प्रशासन पाण्याची गळती रोखण्यासाठी लिकेज काढण्याचे काम करत आहे, एक वेळा खोदून पूर्ण लिकेज काढला व नाली बुजवली लगेच काही दिवसात जैसे थे लिकिज काढण्यासाठी पुन्हा खोदून ठेवले आणि पुन्हा लिकिज काढून नाली बुजविण्यात आली सततच्या खोदकामामुळे सदर माझ्या दुकानासमोरील जागा ही भुसभुशीत झाली त्यामुळे वाहने फसत असून एकूण तीन वेळा मालवाहू ट्रक फसला व प्रत्येक वेळी फसलेला ट्रक काढण्यासाठी जेसीबी लावावी लागत असून फसलेली गाडी काढायला दोन ते तीन हजार रुपये खर्च येत आहे तेव्हा यावर नगरपंचायत प्रशासनाने कायम तोडगा काढून मांजर आणि उंदरांचा खेळ थांबवावा.
-आशिष कोडगिरवार
संचालक ऋतिक ट्रेडर्स