धानोरा : तुकुम शेतशिवारात विज पडुन बैलाचा मृत्यु ?

260

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, २२ मार्च : तालुक्यातील साजा क्रमांक ११ अंतर्गत येत असलेल्या तुकुम येथील शेतकरी रामचंद्र पुंडलिक सयाम यांचा बैल घरी न आल्याने इतरत्र शोधाशोध केली असता गावापासून सरासरी दीड ते दोन किलोमीटर अंतरावर काशीराम दुगा यांच्या शेतात बैल मृतावस्थेत आढळले. याबाबत त्यांनी लगेच गावात व तलाठ्याला माहिती दिली असता जाणकारांच्या मते वीज पडून बैलाचा मृत्यू झाल्याचे समजले जाते. सदर घटना २१ मार्च रोजी सायंकाळ किंवा रात्रीच्या सुमारास घटना घडल्याचे समजते. त्यामुळे शेतकऱ्याचे सरासरी ३५ ते ४० हजाराचे नुकसान झाल्याचे निदर्शनास येत आहे. तलाठी धानोरा यांचे सोबत संपर्क साधला असता शवविच्छेदन प्रमाणपत्र आल्यानंतरच बैलाचा मृत्यु विज पडून झाला की इतर कारणाने झाला ते कळेल. वीज पडून मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन प्रमाणपत्र आल्यास शासनातर्फे आर्थिक मदत देण्यासाठी आपण वरिष्ठांकडे अहवाल सादर करू असेही तलाठी यांनी भ्रमणध्वनी द्वारे संवाद साधताना सांगितले.

(The gadvishva) (The gdv) (Dhanora) (Gadchiroli)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here