मासिक पाळी प्रशिक्षणातून ८० मुलींचे समुपदेशन

174

– लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड सुरजागड आयर्न ओर व त्रिशरण एनलायटमेंट फॉउंडेशन पुणे यांचे संयुक्त विद्यामाने वस्त्र उद्योग व प्रशिक्षण केंद्र हेडरी येथे कार्यक्रम
The गडविश्व
गडचिरोली, ३१मार्च : लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लि. सुरजागड आयर्न, ओर व त्रिशरण एन्लायटनमेंट फाऊंडेशन, पुणे आणि सामाजिक बांधिलकीत विविध सामाजिक कार्यात अग्रसेर राहिली आहे. याअंतर्गत नुकताच एटापल्ली तालुक्यातील अतिसंवेदनशील भागातील वस्त्र उद्योग व प्रशिक्षण केंद्रातील किशोरवयीन मुलींना हेडरी येथील महिलांना सुमारे ८० किशोरवयीन मुलींना मासिक पाळी व्यवस्थापन विषयक प्रशिक्षण देत समुपदेशन करण्यात आले.
अतिसंवेदनशील व आरोग्य दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या कार्यशाळेस विद्यार्थिनीनी आपला उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवून आपल्या आरोग्याविषयी माहिती जाणून घेतली. या कार्यशाळेत संस्थेच्या विकासदूत तरुणीनी मासिक पाळीविषयी समज- गैरसमज, अंधश्रद्धा, रूढी परंपरा याबाबत पडदा टाकणारे पथनाट्य सादर केले. या विद्यार्थिनींना या उपक्रमात संस्थेने किशोरवयीन मुलींना सोप्या पद्धतीने समजावे व मासिक पाळीबद्दल त्यांचे गैरसमज दूर व्हावेत यासाठी संस्थेने तयार केलेले मासिक पाळी दरम्यान काळजी कशी घ्यावी याबाबतचे चित्रमय पुस्तक वितरीत करण्यात आली.
या वेळी लॉयड्स मेटल्सचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गोपाळ रॉय, त्रिशरण फॉउंडेशन व्यवस्थापक प्रशांत वाघमारे आणि करिष्मा फुलभांदे यांनी मोलाची मार्गदर्शन केलेत. सोना मत्ती लकडा, माधवी नालीवार इतर गावातील महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here