– सर्व प्रवासी सुखरूप, परिसरात बॅनर आणि पोस्टर्सही लावले
The गडविश्व
दंतेवाडा, १ एप्रिल : छत्तीसगडमधील दंतेवाडा आणि नारायणपूर जिल्ह्यात चालणाऱ्या प्रवासी बस ची नक्षल्यांनी जाळपोळ केल्याची घटना उघडकीस आली आहे. बसमधील सर्व प्रवासी सुखरूप असून नक्षल्यांनी परिसरात बॅनर आणि पोस्टर्सही लावल्याची माहिती असून यासोबतच या मार्गावर बस न चालवण्याची धमकीही चालकाला देण्यात आल्याचे कळते.
शनिवारी नारायणपूरहून दंतेवाडाच्या दिशेने २० प्रवासी घेऊन बस जात होती. दरम्यान मालेवाही पोलीस ठाण्याच्या हद्दीत दंतेवाडा-नारायणपूर दरम्यान बरसूर-पल्ली मार्गावर घोटिया चौकात सुमारे २५ ते ३० नक्षल्यांनी बस अडवली व सर्व प्रवाशांना खाली उतरवत त्यानंतर डिझेलची टाकी फोडून बस पेटवून दिली. तसेच परिसरात मोठ्या प्रमाणात बॅनर आणि पोस्टर्सही लावण्यात आले होते अशी माहिती आहे तर या मार्गावर बस न चालवण्याची धमकीही चालकाला देण्यात आली आहे. याबाबतचे वृत्त एका वृत्तसंस्थेने प्रकाशित केले आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी फौजफाटा रवाना करण्यात आला आहे. नक्षल्यांनी झाडाची फांदी तोडून रस्त्यावर टाकली आहे.
(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (The gdv) (Muktipath) (Chandrpur News Updates) (Game of Thrones) (Lucknow Super Giants) ( Man City) (Bihar Board 10th Result 2023) (JioCinema) (Tata ipl 2023) (Naxalites set fire to a passenger bus)