गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई भरती २०२१ ची लेखी परीक्षा शांततेत संपन्न ; तात्पुरती उत्तरतालीकाही जाहीर

918

– परीक्षेतील प्रश्नाच्या उत्तरावर काही आक्षेप असल्यास नोंदविण्याचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, २ एप्रिल : गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई भरती २०२१ च्या ३४८ जागांसाठी रविवार ०२ एप्रिल २०२३ रोजी – गडचिरोली पोलीस दलामार्फत लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. ही परीक्षा शांततेत व अत्यंत पारदर्शक पध्दतीने गडचिरोली पोलीस दलाने पार पाडली असून तात्पुरती उत्तरतालीकाही जाहीर केली आहे. तर उमेदवारांकरिता काही सूचनाही निर्गमित करण्यात आल्या आहेत.
गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई भरती २०२१ करीता उमेदवारांची ५ ते १७ जानेवारी पर्यत मैदानी चाचणी घेण्यात आली होती. मैदानी चाचणी मध्ये पात्र ठरलेल्या ३३०७ उमेदवारांची रविवार २ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ०८.३० वा. आयोजीत करण्यात आलेली होती. यामध्ये पहिला पेपर सामान्य ज्ञान या विषयाचा सकाळी ०८.३० ते १०.०० या दरम्यान व दुसरा पेपर गोंडी व माडीया या विषयावर सकाळी ११.०० ते १२.३० वा. दरम्यान घेण्यात आला. सदर दोन्ही लेखी परीक्षेची तात्पुरती उत्तर तालिका पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांचे www.gadchirolipolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

तात्पुरती उत्तरतालिका डाउनलोड करा

तात्पुरती उत्तर तालिका सदर लेखी परीक्षेतील प्रश्नाच्या उत्तरावर काही आक्षेप असल्यास उमेदवारांनी २ एप्रिल २०२३ चे दुपारी ०१:०० वाजेपर्यंत पोलीस अधीक्षक कार्यालय गडचिरोली येथील समाधान कक्ष येथे व्यक्तीगतरित्या हजर राहुन आक्षेप नोंदवु शकतात. ३ एप्रिल २०२३ चे दुपारी ०१:०० वाजतानंतर प्राप्त होणाऱ्या कोणत्याही आक्षेपाची नोंद घेतली जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी, उमेदवारांनी कुठल्याही प्रलोभन किंवा आमिषाला बळी पडु नये तसेच कोणतीही व्यक्ती अथवा संस्था आमिष किंवा प्रलोभन देत असेल तर पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली येथील समाधान कक्ष यांचे दुरध्वनी क्रमांक 8806312100 यावर तसेच उपविभागीय पोलीस अधीकारी कार्यालय / पोस्टे / उपपोस्टे / पोमके / पोलीस मुख्यालय येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
लेखी परीक्षेच्या सर्व केंद्राच्या ठिकाणी ७०० च्या आसपास पोलीस अधिकारी व अंमलदारांची नेमणूक करून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता. गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई भरती – २०२१ पासुन कोणतेही उमेदवार वंचित राहु नये म्हणुन वेळोवेळी सोशल मिडीया मार्फत गडचिरोली पोलीस दलाकडुन सुचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे बहुसंख्य उमेदवारांनी लेखी परीक्षेकरीता आपली हजेरी लावल्याचे दिसुन आले.

(The gadvishva) (the gdv) (gadchiroli police bharti 2021) (gadchiroli police recrutment 2021) (police bharti exam)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here