The गडविश्व
गडचिरोली, ३ एप्रिल : गडचिरोली व धानोरा तालुका सीमावर्ती भागात सुरु असलेले दारूअड्डे व मोहफुलाचा सडवा नष्ट केल्याची कृती मुक्तीपथ टीम गडचिरोली, धानोराने गाव संघटनेच्या सदस्यांच्या सहकार्याने केली.
गडचिरोली सीमेवर चांदाळा व धानोरा तालुक्यातील जांभळी परिसरातील नदी शिवारात दारूअड्डे लावून दारू गाळली जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. माहितीच्या आधारे गाव संघटनेच्या सदस्यांसह धानोरा व गडचिरोली मुक्तिपथ तालुका चमूने शोधमोहीम राबवली असता, विक्रेत्यांनी हातभट्टी सोडून जंगलच्या दिशेने पळ काढला. यावेळी विविध ठिकाणी दारू गाळण्यासाठी टाकलेला मोहफुलाचा सडवा आढळून आला. असा एकूण जवळपास १ लाख ३० हजारांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. याबाबतची माहिती मिळताच सदर विक्रेत्यांची माहिती काढून गडचिरोली पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (The gdv) (Muktipath) (Chandrpur News Updates) (Game of Thrones) (Lucknow Super Giants) ( Man City) (Bihar Board 10th Result 2023) (JioCinema) (Tata ipl 2023)