– दोन ट्रकची झाली टक्कर, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली
The गडविश्व
कोरची, ५ एप्रिल : कोरची- कुरखेडा मार्गावर असलेल्या बेडगाव घाटावर ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने समोर असलेल्या दुचाकीला धडक बसून अपघात झाल्याची घटना बुधवार ५ एप्रिल रोजी दुपारी १२ ते १ वाजताच्या दरम्यान घडली. या अपघातात दुचाकीवरील दोघेजण जागीच ठार तर एकजण जखमी झाल्याचे कळते. तर ब्रेक फेल झाल्याने त्या ट्रक ने दुचाकीला टक्कर देत दुसऱ्या ट्रकला धडक दिल्याने दोन्ही ट्रकचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर त्यावेळी वाहनाची कमी वर्दळ असल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे.
कुरखेडा-कोरची मार्गे छत्तीसगड ला नेहमीच ट्रक ने वाहतूक होत असते. अनेकदा बेडगाव घाट मध्ये ट्रकचे अपघात झालेले आहेत. दरम्यान आज दुपारच्या सुमारास कोरची मार्गे कुरखेडा कडे सीजी ०४ एनटी १११३ क्रमांकाचा ट्रक मार्गक्रमन करीत होता. अचानक ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने व उतार भाग असल्याने पुढे जात असलेल्या एमएच ३३ डी ९१९६ क्रमांकाच्या दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवर असलेले नागसु दुर्ग कुंजाम (६५), रामदास दर्याव कुंजाम (५०) हे जागीच ठार झाले तर रमेश नागसु कुंजाम (३९) हा किरकोळ जखमी झाला.
ब्रेक फेल झाल्याने व उतार भाग असल्याने दुचाकीला धडक देत तो ट्रक पुढे चालू लागला यावेळी कुरखेडा मार्गे देवरी जात असलेल्या एमएच १४ एचयू १८६२ क्रमांकाच्या ट्रक ला जोरदार धडक दिली यात दोन्ही ट्रकचा चेंदामेंदा झाल्याचे कळते. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी साहिल झरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुराडा पोलीस स्टेशनचे अधिकारी करीत आहेत.
मोठी दुर्घटना टळली
कुरखेडा-कोरची मार्ग हा छत्तीसगड राज्याला जोडणार मार्ग आहे. या मार्गावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. अशातच या मार्गावर नागमोळी जवळपास १० किमी चा घाट असल्याने सतर्कता बाळगुनच वाहन चालवावे लागते. हा मार्ग छत्तीसगड राज्याला जोडणारा असल्याने नेहमीच तेलंगना राज्य तसेच चंद्रपूर,गडचिरोली येथून मोठ मोठ्या जडवाहनाने वाहतूक होत असते. अनेकदा या घाटावर ट्रकचे अपघात झाले आहेत. कोरची मार्गे कुरखेडा येत असताना घाटावरून उतार आहे व कुरखेडा मार्गे कोरची जात असताना चढ भाग असल्याने कोरची कडे जाणारे वाहने हे अधिक वेगात असतात. अशावेळी मोठी दुर्घटना होण्याचीही शक्यता असते. कोरची मार्गे येत असताना ट्रक चा ब्रेक फेल होऊन अपघात झाला त्याक्षणी पुन्हा इतर वाहने जवळपास असती तर मोठी दुर्घटना घडली असती. सुदैवाने त्यावेळेस वाहनांची वर्दळ नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.
(The gadvishva) (The gdv) (bedgao ghat) (korchi kurkheda) ( truck road accident) (truck brek fail)