– इतरही जिल्ह्याना हवामान विभागाचा अलर्ट
The गडविश्व
गडचिरोली, ६ एप्रिल : नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने गुरुवार ६ एप्रिल ते ८ एप्रिल पर्यंत पावसाचा अलर्ट जारी केला आहे. यामध्ये गडचिरोली- चंद्रपूर जिल्ह्याला आज ५ एप्रिल व ८ एप्रिल ला ‘येलो’ अलर्ट तर उद्या ७ एप्रिल ला ‘ऑरेंज’ वर्तविला आहे. यामुळे कधीही पाऊस पडण्याची शक्यता आहे.
नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने दर्शविल्याप्रमाणे नागपुर विभागातील नागपूरसह वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्र्पुर, गडचिरोली जिल्ह्याला पावसाचा अलर्ट जारी केला आहे. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यालाच ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान एक दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटेसह मेघागर्जना हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
ऐन उन्हाळ्यात पावसाच्या आगमनाने नागरिकांना काही प्रमाणात गर्मी पासून दिलासा मिळणार असला तरी याचा फटका काहींना बसणार आहे तर आरोग्यावरही याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
(The Gadvishva) (Gadchiroli Chandrapur Nagpur Bhandara Gondiya Wardha) (‘Yellow’ alert for three days of rain for ‘these’ districts including Gadchiroli)