मरेथॉनमधून दारूविक्रेत्यांना नोटीस देण्याचा निर्णय

164

-३५ जणांचा सहभाग
The गडविश्व
गडचिरोली, ६ एप्रिल : धानोरा तालुक्यातील मिचगाव खु. येथे मुक्तीपथतर्फे आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत 35 जणांनी सहभाग घेतला. दरम्यान, स्पर्धेचे रूपांतर सभेत करून गावातील दारूविक्रेत्यांना नोटीस देण्यासह अवैध दारूमुक्त गाव निर्माण करण्यासाठी विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
‘दारू व तंबाखू मुक्तीसाठी धावूया’ ही या मॅरेथॉन स्पर्धेची मुख्य थीम आहे. स्पर्धेच्या माध्यमातून गावाच्या दारू व तंबाखूमुक्तीसाठी गावातील सक्रीय युवक, महिला व पुरुष यांनी एकत्र यावे. या उद्देशाने मुक्तिपथ द्वारा गावातील संघटन सदस्याच्या सहकार्याने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या माध्यमातून गावातील 35 जणांनी धाव धरून अवैध दारूविक्री विरोधात एकी दाखवली. यासाठी ग्रामस्थांनी सुद्धा उत्तम प्रतिसाद दिला. दरम्यान, स्पर्धेचे रूपांतर सभेत करून मुक्तीपथ महिला संघटना पुनर्गठित करण्यात आली. दारू व तंबाखु विरोधात जनजागृती करण्यासाठी गावात एकदिवसीय रॅलीचे नियोजन केले. अवैध मुजोर दारू विक्रेते यांना नोटिस देण्यासह गावातून अवैध दारूविक्री थांबवण्यासाठी विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. त्यांनतर स्पर्धेत यशस्वी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. .सदर कार्यक्रमासाठी पोलीस पाटील रामचंद्र कुदेशी व महिला संघटना यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे नियोजन राहुल महाकुलकार, शुभम बारसे यांनी केले.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (The gdv) (Muktipath) (Chandrpur News Updates) (Game of Thrones) (Lucknow Super Giants) (Man City) (Bihar Board 10th Result 2023) (JioCinema) (Tata ipl 2023) ((Bombay High Court Recruitment for 160 Vacancies, Last date to apply is 7th April)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here