जंगलातील वनव्यामुळे झाड रस्त्यावर कोसळले, मुरूमगाव-मालेवाडा मार्गावर रहदारीस अडथळा

1000

The गडविश्व
ता. प्र / धानोरा, ६ एप्रिल : तालुक्यातील मुरूमगाव येथून ७ किलोमीटर अंतरावर मुरूमगाव-मालेवाडा मार्गावर फुलकोडो गावाजवळच्या वळणावर जंगलाला लागलेल्या वनव्यामुळे झाड रस्त्यावर कोसळल्याने चारचाकी वाहनाच्या रहदारीस अडथळा निर्माण झाला आहे.
फुलकोडोच्या जंगल परिसरात ५ एप्रिल २०२३ ला रात्रोपासून लागलेल्या वनव्यामुळे आग जंगलात पसरली. तीच आग रस्त्यालगत असलेल्या झाडाला लागली. झाडाचा बुंधा जळल्याने बुधवार ६ एप्रिल रोजी दुपारी १२.०० वाजताच्या दरम्यान झाड रस्त्यावर कोसळले, झाडाने पुर्ण रस्ताच व्यापल्याने चार चाकी वाहनांना रहदारीस अडथळा निर्माण झाला असून वाहन धारकांना आपले वाहन उलट जयसिंगटोला ते येरकड मार्गे मुरूमगाव असे मार्ग क्रमन करावे लागत आहे. तर दुचाकीस्वाराना आपले वाहन जंगलातून काढताना बरीच तारेवरची कसरत कारवी लागत आहे.
आज सकाळी ८.०० वाजता दरम्यान या परिसरात अवकाळी पाऊस आला त्यामुळे जंगलातील पेट घेतलेले झाड अचानक पडले, त्याच वेळेस रहदारी करणारा दुचाकी स्वार थोडक्यात बचावला. जंगलातील वनव्या मुळे परिसरातील वृक्ष संपदाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन रहदारीस सुद्धा अडथळा निर्माण होतो याकडे वन विभागाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (The gdv) (Muktipath) (Chandrpur News Updates) (Game of Thrones) (Lucknow Super Giants) (Man City) (Bihar Board 10th Result 2023) (JioCinema) (Tata ipl 2023) ((Bombay High Court Recruitment for 160 Vacancies, Last date to apply is 7th April)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here