गडचिरोली : देशी दारूसह १ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त

794

The गडविश्व
ता.प्र /देसाईगंज, ९ एप्रिल : जिल्ह्यात दारूबंदी असतांना छुप्या मार्गाने अवैध रित्या दारूची तस्करी होत असते. याबाबत देसाईगंज पोलिसांना अर्जुनी वरून दुचाकी वाहनाने दारूची वाहतूक होत असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली असता पोलीस निरीक्षक रासकर यांच्या मार्गदर्शनात सापळा कारवाई करत अवैधरित्या देशी दारू व दुचाकी वाहन असा एकूण १ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त करत आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
यश सुनिल गेडाम (२४) तुकुम वार्ड, देसाईगंज ता. देसाईगंज जिल्हा गडचिरोली, शैलेश विनोद बोरकर (२८) गोकुलनगर, देसाईगंज ता. देसाईगंज जिल्हा गडचिरोली आई आरोपींची नवे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, गडचिरोलीच्या शेजारी असलेल्या भंडारा, गोंदिया जिल्ह्यात दारू सुरू आहे. यामुळे गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी असतांना अवैध दारू व्यावसायिक छुप्या मार्गाने शेजारील जिल्ह्यातून दारूची वाहतूक करतात. अर्जुनी येथून ९ एप्रिल रोजी सकाळी एका दुचाकी वाहनाने दारूची वाहतूक हिट असल्याची माहिती देसाईगंज पोलिसांना मिळाली असता सापळा कारवाई करत सदर वाहनाची झडती घेतली यावेळी ०७ खरड्याच्या बॉक्समध्ये देशी दारू संत्री कंपनीच्या ९० मिली मापाच्या प्रत्येक बॉक्समध्ये प्रत्येकी १०० निपा असा एकूण ७०० निपा अवैध विक्री किंमत १०० रुपये प्रमाणे ७० हजार रुपये तसेच दारूची वाहतूक करण्याकरिता वापरण्यात आलेली एमएच ३३ वाय २०६७ क्रमांकाची दुचाकी होंडा ऍक्टिवा किंमत अंदाजे ६० हजार रुपये असा एकूण १ लाख ३० हजरांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरुद्ध देसाईगंज पोलीस ठाण्यात कलम ६५ (अ),८३,९८ (२) मदाका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक रासकर यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक इनामदार, पो. अमलदार निकलेश सोनवणेसह चमूने केली असून पुढील तपास सुरू आहे.

(The gdv) (the gadvishva) (desaiganj gadchiroli police)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here