सालेभट्टी ग्रा.प.अंतर्गत येणाऱ्या मातलामी टोला येथील मिनी अंगणवाडी सेविकेवर कारवाई करा

327

– गावकऱ्यांची सीईओ यांना तक्रार
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, १० एप्रिल : तालुक्यातील ग्रामपंचायत सालेभट्टी अंतर्गत येणाऱ्या मातलामी टोला येथील मिनी अंगणवाडी सेविका एक महिन्यापासून गैरहजर असून येथील मुलांना पोषण आहार पासुन वंचित ठवून आहाराची अफरातफर करून शासनाच्या योजनेलाच हरताळ फासल्याने सदर मिनी अंगणवाडी सेविकेची सखोल चौकशी करून पदावरून हटविण्याची मागणी सालेभट्टी येथील गावकरी आणि मातलामी टोला यथील गावकऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांना दिलेल्या तक्रारीतून केली आहे.
तक्रारीत म्हटले आहे की धानोरा पासुन ४ कि.मी.अंतरावर असलेल्या सालेभट्टी ग्रामपंचायत अंतर्गत  मातलामी टोला नावाची मिनी अंगणवाडी आहे. या अंगणवाडीत  रोशनी गुरुदेव कुंमरे ह्या सेविका कार्यरत आहे. परंतु त्या धानोरा येथे वास्तव्याने राहत असल्याने धानोरा येथुन ये-जा करतात. धानोरा ते अंगणवाडी अंतर ४ कि.मी.असून त्या मागिल अंदाजे तीन ते चार महिन्यापासून सतत गैरहजर असून मुलांना पोषण आहार पुरवठा करीत नसल्याचा आरोप गावकरी करित आहेत. सर्रास आपल्या घरी पोषण आहाराची नियत करीत असून मुलांना पोषण आहारापासून वंचित ठेवीत आहे त्यामुळे मुलांना वेळोवेळी आहार मिळत नाही. सरकार एकीकडे मुलांच्या आरोग्याची काळजी घेत असताना कुपोषण मुक्त करण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा आहार पुरवठा करीत असतो. आहारावर महिन्याला लाखो रुपये खर्च होत असतात आणि दर महिन्याला अंगणवाडी केंद्रावर आहार पोहोचविले जातो परंतु अंगणवाडी सेविकाच अंगणवाडी केंद्रात नियमित उपस्थित राहत नाही आणि वेळच्यावेळी मुलांना आहारही वाटप करीत नाही त्यामुळे त्याचा विपरीत परिणाम मुलांवरती होताना दिसतो तसेच अंगणवाडी केंद्रातील मुख्य सेविका यांना न भेटता दुसऱ्या गावातील मिनी अंगणवाडी सेविकेच्या दूरध्वनी संपर्काने पोषण आहाराची उचल करीत असतात आणि तो आपल्या घरी आणून आहाराची अपरातफर करीत आहेत त्यामुळे मुलांना दर महिन्याला आहार मिळत नाही. सदर मुलांचे आहार कुठे गहाळ होत असते याबाबत मिनी अंगणवाडी सेविकेची योग्य ती सखोल चौकशी करून मिनी अंगणवाडी सेविका या पदावरून रिक्त करण्यात यावे तसेच स्थानिक वास्तव्यांनी असलेल्या अंगणवाडी सेविकेची पर्यायी व्यवस्था करण्यात यावी जेणेकरून मुलांना दर महिन्याला नियमित आहार दिल्या जाईल अशा पद्धतीची तक्रार अर्ज गावातील महिला जनिराम मातलामी, कांताबाई मातलामी, रंजनाताई मातलामी, इसरीबाई मातलामी, भागवताबाई मातलामी, मानताबाई मातलामी, ममीताताई हलामी, सरिता मातलामी, सुगंधा नरोटे, शामलताताई मातलामी, विश्वनाथ हलामी, बंडू शेंडे, अनिल गावडे, प्रवीण गुरनुले, प्रफुल सोनटक्के, दिलीप वटी, संदीप शेंडे, संगीता बावणे, हिरामन पदा, शामराव गावडे, सोमाजी शेंडे, प्रल्हाद सोनटक्के, देवनाथ गुरनुले, श्रीकृष्ण शेंडे, दिवाकर शेंडे, राजेश शेंडे, पुरुषोत्तम पंदिलवार, रवींद्र शेंडे, ऋषीजी गावडे, महारोमी गावडे, दौलत मातलामी, सुखदेव तुलावी एकूण ३५ जणांनी  मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांना दिलेल्या तक्रारीतून केली आहे. त्याची प्रतिलिपी  महिला व बालकल्याण अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली गटविकास अधिकारी पंचायत समिती धानोरा यांनाही दिली आहे.

सदर प्रकरणाची चौकशी सुपरवायझर  निलिमा गेडाम यांना करण्यास सांगितले आहे. चौकशीत जे सत्य  समोर येईल .त्यानुसार कार्यवाहीस पात्र राहिल असे बालविकास प्रकल्प अधिकारी धानोरा ए.पी.कटरे यांनी भ्रमणध्वनीवरून  सांगितले.

(The gadvishva) (the gdv) (gadchiroli news updates) (dhanora) (anganwadi sevika) (Tata ipl 2023)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here