गडचिरोली : लाच स्विकारतांना वसतीगृहाचा अधीक्षक एसीबीच्या जाळ्यात

1285

– ५ हजारांची स्वीकारली लाच
The गडविश्व
गडचिरोली, १२ एप्रिल : मानधनात वाढ केल्याचा मोबदला म्हणून तसेच कंत्राटी पदावर नियमित ठेवण्याच्या कामाकरिता ५ हजारांची लाच स्वीकारताना समग्र शिक्षा अभियान वस्तीगृह भामरागड येथील अधीक्षक भीमराव उद्धव अवतरे (५३) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.
प्राप्त माहितीनुसार तक्रारदार यांच्या मानधनात दरमहा ३ हजार रुपये पगार वाढ केल्याचा मोबदला म्हणून तसेच कंत्राटी चौकीदार या पदावर नियमित ठेवण्याच्या कामाकरिता वसतिगृहातील अधीक्षक भिमराव उद्धव अवतरे यांनी ५ हजार रुपये लाच रकमेची मागणी केली मात्र तक्रादरास लाच रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाप्रवी गडचिरोली येथे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे बुधवार १२ एप्रिल रोजी सापळा रचला असता वसतिगृह अधीक्षक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. सदर कारवाईने एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस उपअधीक्षक अनिल लोखंडे यांच्या पर्यवेक्षणात पोनि. शिवाजी राठोड, सफौ.प्रमोद ढोरे, पोहवा नथु धोटे, राजू पदमगिरवार, श्रीनिवास संगोजी, स्वप्नील बांबोळे, किशोर जौजारकर, संदिप घोरमोडे, किशोर ठाकूर, संदीप उडाण, मपोशी विद्या म्हाशाखेत्री, जोत्सना वसाके, तुळशीराम नवघरे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here