समता दौड ला भरघोस प्रतिसाद देत गडचिरोलीकरांचे महात्मा फुले व डॉ. आंबेडकर यांना अभिवादन

287

The गडविश्व
गडचिरोली, १४ एप्रिल : भारतीय संविधानात अंतर्भूत असलेले “समता” हे  मुलभूत मूल्य प्रत्येकाच्या मनात रुजावे आणि समताधिष्ठित समाजाची निर्मिती व्हावी या उददेशाने मुव्हमेंट फॉर जस्टीस च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या “समता दौड” ला गडचिरोली येथे प्रचंड प्रतिसाद मिळाला.
स्थानिक इंदिरा गांधी चौकापासून तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंत ही दौड ठेवण्यात आली होती. यावेळी समता दौडला मुख्य वनसंरक्षक किशोर मानकर व उप विभागीय पोलीस अधिकारी प्राणिल गिल्डा यांनी हिरवी झेंडी दाखविली. मुव्हमेंट फॉर जस्टीसचे सदस्य गौतम मेश्राम यांनी संविधान प्रास्ताविके चे वाचन केल्यानंतर दौडला सुरुवात झाली.
डॉ. आंबेडकर चौकात या दौडचा समारोप करण्यात आला. यावेळी झालेल्या बक्षीस वितरण कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन, ज्येष्ठ आंबेडकरी कार्यकर्ते रोहिदास राऊत, आसान्या ग्रुपचे संचालक प्रकाश शेंडे,  आसान्या फौंडेशन च्या संचालिका मोनिका भडके, सामाजिक कार्यकर्ते डॉ. कैलास नगराळे आणि  वसंत कुलसंगे, उपस्थित होते. समारोपीय कार्यक्रमात या मान्यवरानी समता दौड चे महत्व स्पर्धेकांना पटवून दिले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुव्हमेंट फॉर जस्टीसचे सुकाणू समिती सदस्य डॉ.; दिलीप बारसागडे  यांनी केले तर समन्वयक ऍड. सोनाली मेश्राम यांनी संचालन केले. सामाजिक कार्यकर्ते प्रीतेश अंबादे यांनी आभार मानले.
या समता दौड मध्ये गडचिरोली जिल्ह्यासह विदर्भातील एकूण ७२० स्पर्धेकांनी सहभाग नोंदविला होता. समारोपीय कार्यक्रमात मुव्हमेंट फॉर जस्टीस या समन्वय संघटनेच्या लोगोचे विमोचन करण्यात आले.
या दौडच्या यशस्वीतेसाठी मुव्हमेंट फॉर जस्टीसचे धर्मानंद मेश्राम, राज बन्सोड, विनोद मडावी, प्रा. गौतम डांगे, देवेंद्र सोनपिपरे, प्रतीक डांगे, हंसराज उंदीरवाडे, डॉ. संतोष सुरडकर, ऍड. भावना लाकडे, नरेंद्र वाडे, डॉ. उज्वला शेंडे, रुपेश लाडे, देवानंद फुलझेले, धम्मराव तानादु, सुधीर वालदे, नागसेन खोब्रागडे, तुषार भडके आदीनी मेहनत घेतली. तसेच असान्या ग्रुपच्या संघमित्रा शेंडे, साची शेंडे, मोनिका निम्बेकर , देवेंद्र रायपुरे, मनोज देवकुले, श्री. दोडिया, डॉ. बाळू सहारे, डॉ. यशवंत दुर्गे यांच्या विशेष सहकार्याने हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here