– सावधगिरी बाळगा, गोगाव येथील घटना
The गडविश्व
गडचिरोली, १८ एप्रिल : कुलरमध्ये पाणी भरत असतांना विद्युत करंट लागल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना जिल्हा मुख्यलयापासून काही अंतरावर असलेल्या गोगाव येथे १७ एप्रिल २०२३ रोजी घडली. अश्विनी राकेश मुनघाटे (२७) रा.गोगाव ता.जि.गडचिरोली असे मृतक महिलेचे नाव आहे. सदर घटनेने परिसरात एकचं खळबळ उडाली आहे.
सूर्याचा प्रकोप वाढला आहे, गर्मीने अंगाची लाही लाही होत आहे, नागरिकांनी गर्मीपासून बचावाकरिता कुलर सुरू केले आहे. कुलरचा वापर करताना योग्य काळजी घेण्याचे आवाहन वीज वितरण विभागामार्फ़त करण्यात येते. असे असतांनाही काही नागरिक याकडे दुर्लक्ष करतात.
गोगाव येथील अश्विनी मुनघाटे हे सोमवार १७ एप्रिल रोजी कुलरमध्ये पाणी टाकत होती. दरम्यान तिला विद्युत करंट लागल्याने जागीच तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती तात्काळ गडचिरोली पोलिसांना देण्यात आली असता पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनाकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. तिच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असून गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पुढील तपास गडचिरोली पोलीस करत आहे.
(the gdv) (the gadvishva) (gadchiroli news) (gadchiroli police) ( Gadchiroli: Girl dies due to electrocution while filling water in cooler)