सावधान : गडचिरोली जिल्ह्यात रानटी हत्तींच्या कळपाचे पुनरागमन

1359

– शेतपिकांसह झोपड्यांची केली नासधूस
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, १८ एप्रिल : जिल्ह्यात रानटी हत्तींच्या कळपाने पुन्हा प्रवेश केल्याची माहिती पुढे येत आहे. तर धानोरा तालुक्यातील खोब्रामेंढा परिसरात धुमाकूळ माजवत शेतपिकांसह झोपड्यांची नासधूस केल्याचीही माहिती आहे. यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले असून हत्तींच्या कळपाच्या पुनरागमनाने वनविभागाची पुन्हा एकदा चांगलीच दमछाक उडणार आहे. एकीकडे उन्हाचे चटके तर एकीकडे हत्तींच्या कळपाच्या हालचाली यामुळे होणारी दमछाक याचा सामना वनकर्मचाऱ्यांना करावा लागणार आहे.
काही महिन्यांपूर्वी रानटी हत्तींचा कळप धुमाकूळ माजवत गडचिरोली जिल्ह्यातून छत्तीसगड राज्यात गेला होता. मात्र आता पुन्हा छत्तीसगड राज्यातून धानोरा तालुक्यातील मुरूमगाव वन परिक्षेत्रातुन गडचिरोली जिल्ह्यात दाखल होत तालुक्यातील मालेवाडा वनपरिक्षेत्रात या कळपातील काही हत्तींचे दर्शन घडले आहे असून धानोरा तालुक्यातील खोब्रामेंढा येथील शेतकऱ्यांच्या उन्हाळी धान पिकांची तसेच शेतातील झोपड्यांची नासधूस केली. रानटी हत्तींच्या कळपाच्या पुनरागमनाने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रानटी हत्तींचा कळप हा छत्तीसगड राज्यातून धानोरा तालुक्यातील मुरूमगाव पूर्व वनपरिक्षेत्रातुन प्रवेश करत मालेवाडा वन परिक्षेत्रातील नियतक्षेत्र तलवारगडच्या जंगलात दाखल होत गांगसाय टोला मार्गे १५ एप्रिल ला रात्रो खोब्रामेंढ नियत क्षेत्रात प्रवेश करत खोब्रामेंढा येथील संपत पोरेटी व घनचू पोरेटी यांनी लागवड केलेल्या उन्हाळी धान पिकाची नासधूस केली व १६ एप्रिल रोजी रात्रो खोब्रामेंढा येथील कुमारशहा कुंजाम यांच्या धान शेतीचे व रामसू पोरेटी यांच्या शेतातील झोपड्यांची नासधूस केली. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून सध्या रानटी हत्तींचा कळप येडसकूही उपक्षेत्रातील कक्ष क्रमांक ३५८ मध्ये असल्याचीचे कळते.
तर विशेष म्हणजे जिल्हयात दाखल झालेला हा हत्तींचा कळप हा अर्धाच असल्याचीही माहिती पुढे येत असून अर्धा कळप छत्तीसगड राज्यात आहे त्यामुळे आता तो सुद्धा जिल्ह्यात प्रवेश करू शकतो. त्यामुळे नागरिकांनी हत्तींच्या जवळ जाऊ नये, किंवा चिथावणीखोर कृत्य करु नये, असे आवाहन वनाधिकाऱ्यांनी केले असून वनविभागाची पुन्हा एकदा दमछाक उडणार आहे.

(The gdv) (the gadvishva) (elephant enter gadchiroli district dhanora murumgav talwargadh khobramenda malewada kurkheda)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here