होय, आता लोकसंख्येत भारत अव्वलस्थानी ; चीन ला ओव्हरटेक

1343

– UNFPA ने जाहीर केली सविस्तर आकडेवारी
The गडविश्व
नवी दिल्ली, २० एप्रिल : भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश असे म्हटले तर ती थट्टा वाटेल परंतु हे सत्य आहे. भारत देशाने चीन ला ओव्हरटेक करत लोकसंख्येच्या बाबतीत अव्वल स्थानी आहे. युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड (UNFPA)च्या ताज्या आकडेवारीने याची पुष्टी केली आहे. या वर्षीच्या सुरुवातीलाच जागतिक तज्ञांनी २०२३ मध्ये भारत हा सर्वात जास्त लोकसंख्येचा देश असेल असा अंदाज वर्तवला होता. ते आत खरं ठरले आहे.
भारतात चीनपेक्षा २० लाख लोकसंख्या (Population) जास्त आहे आणि देशाची लोकसंख्या वाढत-वाढत १४० कोटींच्या पुढे गेली आहे. तर, चीन मधील जन्मदर यंदा चांगलाच खाली घसरला असल्याने त्यांची लोकसंख्या काहीशी आटोक्यात येत आहे. युनायटेड नेशन्स (UNFPA)च्या आकडेवारीनुसार, भारत आता जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे.
UNFPA चा ‘द स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट २०२३’ हा ‘८ बिलियन लाइव्स, इनफिनिट पॉसिबिलिटीज: द केस फॉर राइट्स अँड चॉइस’ या शीर्षकाने प्रसिद्ध केला गेला आहे. यात नमूद केल्याप्रमाणे भारताची लोकसंख्या आता १,४२८.६ दशलक्ष आहे, तर चीनची लोकसंख्या १,४२५.७ दशलक्ष एवढी आहे. म्हणजेच दोन्ही देशांच्या लोकसंख्येमध्ये २.९ दशलक्ष इतका फरक आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here