The गडविश्व
ता.प्र / धानोरा, २० एप्रिल : तालुका प्रशासनाच्या वतीने शासकीय योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जत्रा उपक्रमाचे आयोजन तालुक्यातील रांगी, पेंढरी, कारवाफा आणि सुरसुंडी या ठिकाणी करण्यात आले आहे .
शासकीय योजनांची माहिती एका छत्राखाली लोकांपर्यंत जत्रा शिबिराच्या माध्यमातून पोहचविण्यासाठी तालुक्यातील रांगी येथे २६ एप्रिल, पेंढरी येथे ११ मे, कारवाफा येथे २३ मे तर सुरसुंडी येथे २६ मे २०२३ रोजी ११.०० ते ५.०० या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.
याचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.