गडचिरोली पोलीस भरती २०२३ च्या वाहन चालक परीक्षेत गडचिरोली जिल्ह्यातुन संयुक्तरीत्या प्रथम क्रमांक
लक्ष्यवेध स्पर्धा परीक्षा अकॅडमीची मनीषा गंगापुरीवार हिने प्राप्त केले. या विद्यार्थ्यांनीची यशोगाथा
माझे नाव मनीषा पेंनटया गंगापूरीवार मु. नागेपल्ली ता. अहेरी जि. गडचिरोली.
माझे संपूर्ण शिक्षण राजे धर्मराव हायस्कूल नागेपल्ली येथे झाले. माझ्या घरी माझा भाऊ पोलीस शिपाई असल्याने माझी पण पोलीस बनण्याची इच्छा होती. बारावीनंतर मी नर्सिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतली, दोन वर्ष नर्सिंग करण्यात गेले, सोबतच आष्टी येथील महाविद्यालयातून मुक्त विद्यापीठातून पदवी घेतली. २०१८ मध्ये माझी पहिली पोलीस भरती दिली तेव्हा मला अपयश आले तेव्हाच माझ्या एका मैत्रिणीने सांगितले की गडचिरोली येथे पोलीस भरतीचे क्लासेस घेतले जातात. काही दिवसांनी मी गडचिरोली येथे क्लासेस करण्याकरिता आली हे ठरवले नव्हते की, कोणत्या अकॅडमीत पोलीस भरती करिता प्रवेश घ्यायचा मग मला जिल्हा न्यायालयासमोर एक मोठा बॅनर लावलेला दिसला आणि खऱ्या अर्थाने इथूनच माझ्या पोलीस बनण्याच्या प्रवासाला सुरुवात झाली. लक्ष्यवेध अकॅडमी मध्ये मला मिळालेले गुरु राजीव सर यांच्या बद्दल जेवढे सांगू तितके कमीच आहे. क्लासमध्ये विद्यार्थी १०० असोत किंवा दोन पण राजीव सर नेहमीच प्रत्येक विषयावरती मुद्देसूद शिकवायचे. राजीव सर नेहमीच विद्यार्थ्यांना शिकविताना अभ्यासातील प्रत्येक टॉपिक का महत्त्वाचा आहे हे नेहमीच सांगत आणि या सर्व शिकविण्याचा मला तसेच इतर विद्यार्थ्यांना खूपच फायदा झाला. योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळाल्यामुळेच मला आज हे यश संपादन करता आले. मी २०२२ मध्ये पोलीस भरती दिली परंतु एका गुणाने मला अपयश आले. माझ्यासोबत सराव केलेल्या अकॅडमी मधील सर्वच मैत्रिणी लागल्या परंतु मलाच अपयश आले. मला आलेल्या अपयशानंतर राजीव सरांनी तू स्वतःवर विश्वास ठेव तू पण नक्कीच एके दिवशी यशस्वी होशील आणि सगळीकडे तुझी चर्चा होईल. सरांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास आज मी सार्थ ठरविला आणि २०२३ मध्ये वाहन चालक व पोलीस शिपाई या दोन्ही पदाकरिता आज माझी निवड झालेली आहे तर वाहन चालक या पदाकरिता घेण्यात आलेल्या परीक्षेत परीक्षेत मी मुला मुली मधून संयुक्तरित्या जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळविला. या प्रवासात राजीव सरांसारखे गुरु मिळाले हे मी माझे भाग्यच समजतो. मला फिजिकल साठी मदत करणारे अतिश, नीलम तसेच पोलीस भरती सराव पेपर मिळवून देणारे दीपक नेवारे यांनी प्रत्येक गोष्टीत मला मदत केली त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानते. तसेच मला माझे आई- वडील भाऊ-बहीण, वहिनी यांनी सुद्धा मला कितीही अपयश आले तरी कधी खचू दिले नाही माझ्यावरती विश्वास दाखविला त्याकरिता मी जीवनभर ऋणी राहीन. लक्ष्यवेध स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या प्राध्यापक वृंदांचा माझ्या आयुष्यात खूप मोठा वाटा आहे. राजीव सरांमुळे मला नवी ओळख मिळाली नाहीतर मी शून्यच होती . मला जे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या जे मदत केले त्या सर्वांची मी आभारी आहे.
– निषा पेंनटया गंगापुरीवार
(निवड वाहन चालक जिल्ह्यातून प्रथम क्रमांक व पोलीस शिपाई 2023)