गडचिरोली : उष्णतेत वाढ, शहरातील डिजिटल तापमान फलक गत वर्षांपासून नादुरुस्त

538

– बनली शोभेची वस्तू
The गडविश्व
गडचिरोली, २ जून : राज्यभरात उष्णतेची लाट पसरली आहे, शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, वाढत्या उष्णतेमुळे लाही लाही होत आहे. तापमान ४० अंशाच्या जवळपास पोहचत आहे तर कधी पार सुद्धा होत आहे. अश्यातच गडचिरोली जिल्हा मुख्यालयातील इंदिरा गांधी चौकातील वाहतूक पोलीस चौकीवर काही वर्षांपूर्वी डिजिटल तापमान फलक लावण्यात आले होते. या तापमान फलकामध्ये तापमान नेमके किती आहे हे कळत होते मात्र गत वर्षांपासून हे डिजिटल तापमान फलक बंद असल्याने शहरातील तापमान किती आहे हे कोणालाही कळत नसून हे तापमान फलक धूळखात आहे तर सध्या ते शोभेची वस्तूच झाली आहे.
लाखो रुपये खर्च करून हे तापमान फलक लावण्यात आले होते यामुळे येथील नागरिकांना दैनंदिन तापमानाची माहिती मिळत होती. तसेच तापमानाची नोंद घेण्यासाठी कर्मचाऱ्यांची नेमनुकही करण्यात आली होती अशी माहिती गतवर्षी प्राप्त झाली होती. मात्र हे डिजिटल तापमान फलक गत वर्षांपासून बंद स्थितीत असल्याने शहराचे तापमान नेमके किती आहे याची माहिती होत नाही आहे. तसेच बंद असलेल्या या डिजिटल तापमापक फलक भोवताल होर्डिंग बॅनरचा वेढा राहत असल्याने ते फलकही दिसेनासे होते. संबंधित विभागाने याची तात्काळ दखल घेऊन नादुरुस्त तापमान फलक दुरुस्त करण्यात यावे अशी मागणी होत आहे.

(The gdv) (the gadvishva) (gadchiroli news ) (muktipath) (serch gadchiroli) (Bayern vs Man City) (Inter vs Benfica) (JEE MAINs Answer Key) (Mohammed Siraj) (Solar eclipse of April 20, 2023) (Roman Reigns) (Mamata Banerjee) (The Song of Scorpions) (Temperature Humidity Led Display Board )

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here