२८ लाखांचे बक्षीस असलेल्या दोन महिला नक्षली चकमकीत ठार

1413

– प्रत्यकी १४ लाख रूपयांचे बक्षीस होते जाहिर
The गडविश्व
बालाघाट, २२ एप्रिल : मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्हयातील गढी पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या कडला जंगल परिसारात शनिवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या चकमकीम दोन महिला नक्षलीस ठार करण्यात पोलीसांना यश आले आहे. ठार झालेल्या दोघी महिला नक्षलीवर प्रत्येकी १४ लाख रूपयांचे बक्षीस जाहीर होते.
सुनिता आणि सरिता असे ठार झालेल्या महिला नक्षलीची नावे आहेत. सुनीता ही टाडा दलमच्या भोरम देव एरिया कमांडर होती, ती सध्या विस्तार दलममध्ये काम करत होती तर सरिता ही नक्षली कबीरची रक्षक होती ती खटया मोचा दलममध्ये कार्यरत होती, ती सुध्दा विस्तार दलमध्ये सक्रिय होती अशी माहिती आहे.
दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले असुन पोलीसांनी दोेन्ही मृतदेह जिल्हा रूग्णालयात हलविले आहे. घटनेनंतर बालाघात पोलिसांनी जंगल परिसरात तीव्र शोधमोहीम सुरू केली आहे.©

(The gdv) (the gadvishva) (gadchiroli news ) (muktipath) (serch gadchiroli) (Bayern vs Man City) (Inter vs Benfica) (JEE MAINs Answer Key) (Mohammed Siraj) (Solar eclipse of April 20, 2023) (Roman Reigns) (Mamata Banerjee) (The Song of Scorpions) (Temperature Humidity Led Display Board ) (Two women with a reward of 28 lakhs killed in an encounter with Naxalites) (naxal) (balghat mp)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here