धानोरा येथे पत्रकार भवनाकरिता जागा उपलब्ध करून द्या

231

– पत्रकारांचे खासदार अशोक नेते यांना निवेदन
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, २२ एप्रिल : धानोरा येथे सर्व वृत्तपत्राचे प्रतिनिधी आहेत. परंतु येथे पत्रकार भवन नाही. त्यामुळे धानोरा येथे पत्रकार भवना करीता जागा उपलब्ध करून देण्याची मागणी खासदार अशोक नेते यांना २१ एप्रिल २०२३ ला दिलेल्या निवेदनातून केली.
समस्या मांडण्याकरता व तालुक्यातील लोकांना पत्रकार परिषद घेण्याकरिता स्वतंत्र धानोरा येथे पत्रकार भावनांच्या इमारतीची नितांत गरज आहे. महसूल विभागाचे भूखंड विद्यानगर येथे आहे. तरी आपण आपले स्तरावरून तहसीलदार यांना पत्रव्यवहार करून जागा उपलब्ध करून द्यावे. कारण यापूर्वी कोतवाल संघटना व पोलीस पाटील संघटना यासाठी लाट राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत त्या पद्धतीने पत्रकार लोकशाहीतील चौथा स्तंभ असून तालुक्यातील विकासात पत्रकाराची भूमिका महत्त्वाची आहे. त्यासाठीच पत्रकार भावनांच्या इमारती करिता जागेची आवश्यकता आहे तरी तालुका पत्रकार संघ धानोराच्या वतीने खासदार अशोक नेते यांना निवेदन देण्यात आले.
निवेदन देताना अध्यक्ष समीर कुरेशी, उपाध्यक्ष दिवाकर भोयर, सचिव भाविकदास करमणकर, समन्वयक बंडू हरणे, प्रसिद्धीप्रमुख ओम देशमुख, सिताराम बडोदे, श्रावण देशपांडे, शरिफ कुरेशी, देवराव कुनघाडकर, मारोती भैसारे आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here