The गडविश्व
ता.प्र / धानोरा, २५ एप्रिल : तालुक्यातील रांगी ते वानरचुवा मार्गावरील नर्सरी जवळ रांगी कडून जाणाऱ्या दुचाकीने वानरचुवामार्गे येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवार २४ एप्रिल सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली.
प्रफुल शेषराव गावळे रा. गट्टेपायली ता.धानोरा, चरण नामदेव नैताम, अविनाश मोहन शिडाम दोन्ही रा.कुरंडी माल ता.आरमोरी जिल्हा गडचिरोली असे जखमींची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, प्रफुल गावळे व शेषराव गावळे दोघेही (बाप व मुलगा) हे रांगी कडुन एमएच ३४ एक्यू १६२७ क्रमांकाच्या दुचाकीने नरचुली गावाला जात होते. तर एमएच ३३ जे ९२६५ क्रमांकाच्या दुचाकीने कुरंडी येथील चरण नैताम व अविनाश शिडाम हे रांगी कडे येत असतांना नाळेवाही नाल्यासमोर नर्सरी जवळ दोन दुचाकींची सामोरासमोर धडक बसून अपघात झाला. अपघातात दुचाकी वाहन क्षतीग्रस्त झाले असून अपघातातील जखमी झालेले कुरंडी येथील चरण नैताम व अविनाश शिडाम यांना रांगी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले तर प्रफ्फुल शेषराव गावळे यांच्या डोक्याला व इतर ठिकाणी गुप्त मार लागून गंभीर जखमी झाल्याने गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
(the gdv the gadvishva gadchiroli rangi dhanora two bike road accident)