निमगाव येथे जागतिक मलेरिया दिनानिमित्त फेरीतुन जनजागृती

289

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, २६ एप्रिल : तालुक्यातील निमगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत निमगाव जिल्हा परिषद शाळेच्या वतीने जागतिक मलेरिया दिनानिमित्त मंगळवार २५ एप्रिल रोजी जनजागृती फेरी काढण्यात आली.
धानोरा तालुक्यातील निमणवाडा गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या निमगाव येथे जागतिक मलेरिया दिनाची माहिती लोकांना व्हावी, मलेरीया रोगा बदल जनजागृती करण्यासाठी काढण्यात आलेल्या फेरीत निकुरे परिचारिका, गया खोब्रागडे, राजगडे मॅडम, पूजा सिस्टर, कोल्हे शिक्षक, राऊत मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका यमुनाबाई सहारे, वनिता खोब्रागडे आणि विद्यार्थी सहभागी झालेले होते.

(the gdv gadvishva gadchiroli dhanora nimgao ) (Public awareness through round on World Malaria Day at Nimgaon)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here