उद्यापासून शाळा सुरू, विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणं बंधनकारक नाही : मंत्री आदित्य ठाकरे

224

The गडविश्व
मुंबई : उद्यापासून राज्यातील शाळा सुरू होणार आहेत. मात्र शाळा सुरू होत असल्या तरी पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणे बंधनकारक नाही. सध्याच्या परिस्थितीनुसार ज्यांना योग्य वाटते त्या पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे. उद्यापासून शाळा सुरू होत असल्या तरी पुढची पावले कशी टाकयची हे शाळा आणि पालकांनी ठरवायचे आहे, असे मत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.
कोरोना महामारीच्या काळात तब्बल सातशे दिवस शाळा बंद होत्या. त्यामुळे ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा धोका कमी झाला आहे अशा जिल्ह्यांमध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here