अलोणी शेतशिवारातील ५० हजारांचा मोहफुलाचा सडवा नष्ट

156

-गडचिरोली पोलीस व मुक्तीपथची संयुक्त कारवाई
The गडविश्व
गडचिरोली, २ मे : तालुक्यातील अलोणी शेतशिवारातील दारूविक्रेत्यांचा जवळपास ५० हजार रुपये किमतीचा ९ ड्रम मोहफुलाचा सडवा व साहित्य नष्ट केल्याची कारवाई गडचिरोली पोलीस व मुक्तीपथने संयुक्तरित्या केली.
गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या 9 किलोमिटर अंतरावर असलेल्या अलोणी गावात अनेक वर्षांपासून अवैध दारूविक्री केली जात आहे. दारूविक्रीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या या गावात गडचिरोली, जेप्रा, राजगाठा माल, राजगाठा चेक, बोदली माल, तुकुम, विश्रामपुर या गावातील लोक दारू पिण्यासाठी येतात .सोबतच परिसरातील किरकोळ विक्रेत्यांना दारूचा पुरवठाही केला जातो. या गावातील विक्रेत्यांनी दारू गाळण्यासाठी शेतशिवारात ठिकठिकाणी मोहफुलाचा सडवा टाकला असल्याची गुप्त माहिती मिळाली. माहितीच्या आधारे गडचिरोली पोलीस व मुक्तीपथ तालुका चमूने संयुक्तरित्या शोधमोहीम राबवली असता, ९ ड्रम मोहफुलाचा सडवा व दारू गाळण्याचे साहित्य आढळून आले. घटनास्थळी मिळून आलेला संपूर्ण मुद्देमाल नष्ट करण्यात आला. ही कारवाई पोलिस नाईक कलाम पठाण , मुक्तीपथचे रेवणाथ मेश्राम यांनी केली.

(the gdv) (the gadvishva) (muktipath serch gadchiroli) (gadchiroli news updates) (polis bharti 2023) (gadchiroli police bhharti certifacate) (Gadchiroli: Fake project certificate scam, eight more accused arrested) (National Lok Adalat: 335 pending and 697 pending cases settled by mutual compromise)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here