उपजिल्हा रुग्णालय आरमोरी येथे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे कार्ड वितरण

311

The गडविश्व
ता.प्र  / आरमोरी : महाराष्ट्र दिनाच्या निमित्याने उपजिल्हा रुग्णालय, आरमोरी येथे १ मे रोजी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे कार्ड वैद्यकिय अधिक्षक यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाची महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व केंद्र शासनाची प्रधानमंत्री जन आरोग्य योजना एकत्रितपणे राबविले जात आहे. या योजने अंतर्गत शासकिय व खाजगी अंगीकृत रुग्णालयामध्ये मोफत शस्त्रक्रिया व उपचार केले जाते.
आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत १२०९ उपचारा करिता प्रतिवर्ष प्रति कुटंब ५ लक्ष तर महात्मा ज्योतीराव फुले नज आराग्ये योजना अंतर्गत ९९६ उपचारा करिता १.५ लाखा पर्यंत शस्त्रक्रिया व उपचारा करीता विमा संरक्षण दिले जातात. या योजनेचा लाभ घेण्याकरीता वैद्यशिधा पत्रिका, ओळखपत्र, आयुष्यमान भारत कार्ड असने आवश्यक आहे.
आरमोरी तालुक्यात एकुण आयुष्यमान पात्र ३४३०० लाभार्थी असुन त्यापैकी १०४५४ लाभार्थ्यांचे कार्ड तयार झाले असुन उर्वरीत २३८३२ लाभार्थ्यांनी आपले आयुष्यमान भारत कार्ड तयार करुण घ्यावे असे आव्हान वैद्यकिय अधिकारी डॉ. छाया उईके यांनी केले आहे.
उपजिल्हा रुग्णालय, आरमोरी येथे आयूष्यमान भारत कार्ड काढणे सुरु आहे. सदर माहिती करीता जिल्हा प्रमुख निलेश धाकडे , सुपरवायझर लक्षमिकांत वासनिक, आरोग्य मित्र शमोहनकर यांचेशी संपर्क साधावा. तसेच आपल्या जवळच्या ग्रामपंचायत आपले सरकार सेवा केंद्र येथे कार्ड काढने करीता संपर्क साधावा आई आवाहन करण्यात आले आहे.

(the gdv) (the gadvishva) ( armori) (ayushman bharat yojna) (gadchiroli news updates)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here