कोटगुल-ग्यारापत्ती रस्त्याचे काम निकृष्ठ दर्जाचे : १५ दिवसात उखडले डांबरीकरण

310

– रस्ता कामाची चौकशी करण्याची मागणी
– डांबर,चुरी हाताने बाजुला केल्यास दिसतो जुना रस्ता

The गडविश्व
कोरची: तालुक्यातील कोटगुल -ग्यारापत्ती या पाच किमी रस्त्याचे डांबरीकरण १५ दिवसांपुर्वी करण्यात आले होते. मात्र सदर रस्ता काम हे निकृष्ठ दर्जाचे असल्याचा आरोपी नागरिकांनी करत तयार करण्यात आलेल्या रस्त्यावरील डांबर, चुरी अवघ्या १५ दिवसांतच उखडल्याने गावकऱ्यांनी तिव्र संताप व्यक्त केला आहे.
सदर ५ किमी रस्त्याचे डांबरीकरण करण्यापूर्वी रस्त्यावर ४० एमएमचा कोट देवून बीबीएम करणे आवश्यक होते. पंरतु तसे न करता डांबरीकरण करण्यात आले. सदर रस्ता कामामध्ये डांबराचे प्रमाण कमी प्रमाणात होते. सदर रस्ता कामाच्यावेळेस या कामाची माहिती नागरिकांनी कोरची पंचायत समितीचे सभापती श्रावणकुमार मातलाम, जि.प.सदस्या सुमित्रा लोहंबरे यांना दिली. त्यांनी या कामाची पाहणी केली तेव्हा सदर रस्ता काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे आढळून आले होते. दरम्यान या कामाच्या अभियंत्यांना भ्रमणध्वणीव्दारे संपर्क साधल्यावर त्यानी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे या कामावर त्यांचे कोणतेही नियंत्रण नसल्याचे स्पष्ट झाले. सदर रस्ता कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी पं.स.सभापती श्रावणकुमार मतलाम, जि.प.सदस्या सुमित्रा लोहंबरे, सोनपूरचे माजी सरपंच नरपतसिंग नैताम, पिटेसुरचे सरपंच चैनूराम ताडाम, उपसरपंच मोहन कुरचाम, रामदास हारामी, मोठा झेलियाचे सरपंच गागसाय मडावी, ग्रा.पं. माजी सदस्य देवा हारामी, दानशून हलामी, चंद्रशेखर उमरेख् सुकराम कोरेटी, मिथून तांबेकर व गावातील नागरिकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here