सार्वजनिक अभ्यासिकेसाठी निधी उपलब्ध करून द्या

291

– विद्यार्थी आणि शिक्षकांचे आ.कृष्णा गजबे यांना निवेदन
The गडविश्व
ता.प्र / आरमोरी, ११ मे : तालुक्यातील ठाणेगाव (नवीन) येथे शिक्षक आक्रोश शेंडे यांनी काही महिन्यांपूर्वी स्वखर्चातून सार्वजनिक अभ्यासिका सुरू केली. विद्यार्थ्यांचा भरपूर प्रमाणात प्रतिसादही मिळायला लागला मात्र भौतिक सुविधांची गरज भासत असल्याने निधी उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी आ.कृष्णा गजबे यांना विद्यार्थी आणि शिक्षक अक्रोश शेंडे यांनी निवेदनातून केली आहे.
पुणे आणि यासारख्या मोठ्या नगरात विद्यार्थी जाऊन स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. तिथे अभ्यासिकेत प्रवेश घेऊन अभ्यास करीत असतात. मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही कल्पना आणि स्पर्धा जवळपास बरेच विद्यार्थ्यांना माहीतच नसते. ही कल्पना आणि स्पर्धा विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच माहित असावी याच भावनेतून शिक्षक आक्रोश शेंडे यांनी काही महिन्यांपूर्वी ठाणेगाव (नवीन) येथे स्वखर्चातून शालेय विद्यार्थी अभ्यासिका सुरू केली आणि विद्यार्थ्यांनी भरपूर प्रतिसादही दिला. मात्र भौतिक सुविधांची गरज भासत असल्यामुळे शासनाने अशा प्रकारच्या अभ्यासिका गाव गावात विद्यार्थ्यांसाठी स्थापन करून द्याव्यात असे मत शिक्षक आक्रोश शेंडे यांचे आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांना स्पर्धेत उतरण्याची इच्छा राहू शकते परंतु याप्रकारचे वातावरण ग्रामीण भागात नसल्यामुळे अशी वातावरण निर्मिती होणे गरजेचे आहे. यात वाचनालय ही संकल्पना वेगळी आणि अभ्यासिका ही संकल्पना वेगळी. विशेषतः गडचिरोली जिल्ह्यात रोजगाराची बोंबाबोंब असल्यामुळे शिक्षणाच्या माध्यमातूनच विद्यार्थी स्वतःसाठी संधी निर्माण करू शकतात. आणि त्यासाठी त्यांनी उत्कृष्ठरित्या अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यासाठी विशेष वातावरण आणि सुविधा असणे गरजेचे असल्यामुळे ठानेगाव येथील महाराजस्व कार्यक्रमाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसमवेत आमदार कृष्णाजी गजबे यांना सार्वजनिक शालेय विद्यार्थी अभ्यासिकेसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे निवेदन शिक्षक आक्रोश शेंडे यांनी दिले.

(The gdv, the gadvishva, gadchiroli, armori, thanegao)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here