नवनीत एज्युकेशन लिमिटेड तर्फे देवेंद्र लांजेवार यांचा सत्कार

450

The गडविश्व
गडचिरोली, ११ मे : शैक्षणिक क्षेत्राशी बांधिलकी जपणारे व शैक्षणिक क्षेत्रात कार्य करीत असलेले नवनीत एज्युकेशन लिमिटेड च्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार प्राप्त गडचिरोली जिल्ह्यातील निमगाव जि.प. शाळेतील शिक्षक देवेंद्र लांजेवार यांचा नुकताच शाल, श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
आपल्या देशाच्या भावी नागरिकांमध्ये संस्काराचा ठसा निरंतर कायम ठेवण्याचे कार्य करताना निष्ठेने सेवा केल्याबद्दलच व शिक्षण क्षेत्राचे पवित्र कार्य विविध उपक्रम राबवून शैक्षणिक गुणवत्ता वाढीत प्रगती व सुधारणा केल्याबाबत महाराष्ट्र राज्याच्या वतीने २०२२ चा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार गडचिरोली जिल्ह्यातील निमगाव जि.प.शाळेचे शिक्षक देवेंद्र लांजेवार यांना प्रदान करण्यात आला. त्याच कार्याला अनुसरून नवनीत एज्युकेशन लिमिटेड च्या वतीने संजय निखारे यांच्या शुभहस्ते शिक्षक देवेंद्र लांजेवार यांचा शाल श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
या सत्कार प्रसंगी विलास दरडे, पुरुषोत्तम चिमूरकर, रमेश दरो, दिलीप कुकुडकर आदि सर्व शिक्षक उपस्थित होते.

(the gdv, the gadvishva, navnit education limited, devendra lanjewar, gadchiroli news updates)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here