देसाईगंज : शिक्षक करीत होता चेंजिंग रूम ला छिद्र पाडून मोबाईलने चित्रीकरण, पोलिसांनी ठोकल्या बेडया

2890

– शिक्षक जि.प.शाळेत कार्यरत, महिलेच्या तक्रारीवरून झाली कारवाई
The गडविश्व
ता.प्र / देसाईगंज, १५ मे : चेंजिंग रूम ला छिद्र पाडून कपडे बदलणाऱ्या महिलांचे मोबाईलने चित्रीकरण एक शिक्षक करीत असल्याचा प्रकार देसाईगंज (Desaiganj Gadchiroli)  येथे उघडकीस आला असून त्या शिक्षकास एका महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी बेडया ठोकल्या आहेत.
नंदकिशोर भाऊराव धोटे (४५) रा. कुरखेडा, ह.मु.देसाईगंज असे त्या शिक्षकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार तो कुरखेडा(kurkheda) तालुक्यातील एका जि.प.शाळेत (zp school techer) शिक्षक म्हणून कार्यरत आहे. तर तो देसाईगंज येथे वास्तव्यास राहत असून स्वतःच्या घरी त्याची पत्नी शिवणकाम करते. त्यामुळे पत्नीकडे शिवणकाम करण्याकरिता महिलांची रेलचेल असते.कपडे बद्दलण्याकरिता छोटी खोली करण्यात आली असून या खोलीच्या भिंतीला छोटे छोटे छिद्र पाडून शिक्षक नंदकुमार धोटे हा मोबाईलद्वारे महिलांचे कपडे बद्दलतानाचे चित्रीकरण करत असे. सदर बाब एका महिलेला लक्षात येताच देसाईगंज पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली असता नंदकिशोर धोटेवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले व १५ मे रोजी न्यायालयात हजर केल्याचे कळते. शिक्षकाच्या या कृत्याने मात्र जिल्हाभरात शिक्षण क्षेत्रात एकचं खळबळ उडाली असून पुढे काय कार्यवाही होते याकडे लक्ष लागले आहे. पुढील तपास देसाईगंज पोलीस करीत आहे. ©©

(thegdv) (desaiganj, gadchiroli)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here